मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut's Comment : नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डांसर आणि बबली

• Sanjay Raut's Comment शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नवनीत राणा यांच्यावर टीका करताना जीभ घसरली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut's Comment

• Sanjay Raut's Comment शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नवनीत राणा यांच्यावर टीका करताना जीभ घसरली

अमरावती :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये वानखेडे यांची लढाई एका 'नाची'सोबत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नवनीत राणा यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये संजय राऊत बोलत होते. या वेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डांसर आणि बबली अशा शब्दांचा वापर केला. Sanjay Raut's Comment

लोकसभा निवडणुकी लढाई देशाची लढाई आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नाची विरोधातील नाही. एका डांसर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. Sanjay Raut's Comment

ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषय अपशब्द वापरले. हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसेनेचे पहिले आणि नैतिक कर्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अशा बाईच्या विरोधात शिवसैनिकांनी काम करायला हवे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असला पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा, असे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. Sanjay Raut's Comment

हेही वाचा: EVM Machine : भीतीमुळे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मशीनमध्ये छेडछाड शक्य नाही, असे आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

शेअर करा