मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राहुल गांधींना रामराम करावा लागणार ; खासदार संजय राऊत

Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांच्याकडून एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवैसी यांची पाठराखण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut :

Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांच्याकडून एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवैसी यांची पाठराखण

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रसार माध्यमाचे संवाद साधताना म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांना राहुल गांधींना रामराम करावा लागणार आहे. तसेच शपथविधीच्या कार्यक्रमात खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या जय पॅलेस्टाईन नारावर संजय राऊत यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे.

बुधवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चालली. मात्र आता विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही. तसेच अरविंद केजरीवाल प्रकरणात सरकारने दबाव तंत्राचा वापर करुन जामीन रद्द करुन घेतला", असा आरोप राऊतांनी केला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते नाव घोषित झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, भाजपवर निशाणा

गेल्या दहा वर्षांपासून परंपरा आहे की, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये. लोकसभा अध्यक्षपदावर बसल्यावर ते कोणत्याही पक्षाच राहत नाही. पण गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे हुकूम मानणारे लोकं त्याठिकाणी बसतात. फार मोठी परंपरा त्या पदाला असली तरी ती भारतीय जनता पक्षाने मोडून काढली आहे. आधीच्या लोकसभेत एकाच वेळेला 75 ते 80 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ओम बिर्ला यांना जाणीवपूर्वक लोकअध्यक्षपदावर पुन्हा आणण्याचा प्रयत्न झाला, असा हल्लाही राऊतांनी चढवला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्याबाबत बोलतांना राऊतांनी म्हंटले आहे की, "पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईन हा देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरु आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?", असे संजय राऊत म्हणाले.

शेअर करा