मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : दिल्लीत आंदोलनापूर्वी हायव्होल्टेज ड्रामा; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, पंतप्रधान मोदींचा शेवटचा वाढदिवस असल्याचा दावा!'

Delhi News :दिल्ली/मुंबई ::- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दिल्लीत आंदोलनापूर्वी हायव्होल्टेज ड्रामा; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, पंतप्रधान मोदींचा शेवटचा वाढदिवस असल्याचा दावा!'

Delhi News : दिल्लीत कडेकोट बंदोबस्त अन् 15 हजार वाहने अडकवली; युट्यूबर ध्रुव राठीच्या अटकेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका'

Delhi News :दिल्ली/मुंबई ::- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. "हे जनतेचे बंड आहे आणि सरकार ते कधीही थांबवू शकत नाही. या सरकारच्या अधःपतनाची सुरुवात झाली असून, म्हणूनच आंदोलकांना रोखले जात आहे. या सरकारमध्ये राज्यकर्ते नसून केवळ व्यापारी बसले आहेत," असा घणाघात राऊतांनी केला.https://maharashtramirror.com/ Delhi news

'दिल्लीला बनवले जम्मू-काश्मीर; ट्रेन रोखून दडपशाही सुरू'

केंद्र सरकारच्या दडपशाहीवर ताशेरे ओढताना राऊत म्हणाले की, प्रशासनाने दिल्लीला अक्षरशः जम्मू-काश्मीरसारखे बनवले आहे. तब्बल 15 हजार वाहने दिल्लीच्या बाहेर अडकून पडली असून आंदोलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या ट्रेन रोखल्या जात आहेत. "गृहमंत्री 56 इंचाची छाती असल्याचे सांगत होते, मग आता ते कोणाला घाबरत आहेत? दिल्लीत नेमके काय सुरू आहे, हे तेथील मुख्यमंत्र्यांनाही माहिती नाही," असा दावा त्यांनी केला. तसेच, युट्यूबर ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा निषेध करत हे सरकार दडपशाहीशिवाय दुसरे काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले.https://maharashtramirror.com/ Delhi news

'पुढील सहा महिन्यांत सरकार कोसळणार; मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस'

केंद्र सरकारवर भविष्य वर्तवताना संजय राऊत म्हणाले की, हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि आगामी सहा महिन्यांत कोसळेल. विरोधकांविरोधात दमनशक्तीचा वापर सुरू असून आणीबाणीच्या काळातही हेच घडले होते. "नरेंद्र मोदी, अमित शहा सत्तेवर असणे हे व्होटचोरीचे उत्तम उदाहरण आहे. एप्रिलनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत आणि यंदा पंतप्रधान म्हणून हा त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल. ज्याप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात पर्यायी सरकार स्थापन झाले होते, तसेच सरकार आता देशात येऊ शकते," असे भाकीत करत त्यांनी दिल्ली पोलिसांनाही केंद्र सरकारचे कोणतेही बेकायदेशीर आदेश न पाळण्याचे आवाहन केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा