मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune crime : सदाशिव पेठेत घरफोडी; २.२१ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Pune Crime : पुणे: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती भाग मानल्या जाणाऱ्या सदाशिव पेठ परिसरात घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सदाशिव पेठेत घरफोडी; २.२१ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
सदाशिव पेठेत घरफोडी; २.२१ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुणे: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती भाग मानल्या जाणाऱ्या सदाशिव पेठ परिसरात घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्याने कपाटातील तब्बल २ लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी ६६ वर्षीय वृद्ध महिला (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:४५ ते सायंकाळी ५:४५ च्या सुमारास ही घटना फ्लॅट नंबर ०६, उषःकाल बिल्डिंग, ८१६ अ, सदाशिव पेठ येथे घडली. तक्रारदार महिला आपल्या राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यादरम्यान बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातील कपाट उघडून आत ठेवलेले सोन्या आणि चांदीचे दागिने चोरून पोबारा केला.https://maharashtramirror.com/ Pune crime

महिला घरी परत आल्यानंतर दरवाजाचे कुलूप उचकटलेले दिसले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दिवसाढवळ्या सदाशिव पेठेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घरफोडीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरी झालेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा आणि चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके करत आहेत.

शेअर करा