Pune News : शेतकऱ्यांच्या उसाला भाव आणि अनुदानित संस्थांमध्ये एमपीएससी द्वारे कर्मचारी भरती यासाठी करावे रोहित पवारांनी आंदोलन
Pune News :पुणे : पैसा आणि सोशल मीडिया याचा वापर करून तरुणांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या उशाला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये भाव मिळावा आणि राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाव्या
1 मिनिट वाचन

Pune News :सदाभाऊ खोत यांची मागणी
Pune News :पुणे : पैसा आणि सोशल मीडिया याचा वापर करून तरुणांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या उशाला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये भाव मिळावा आणि राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाव्या यासाठी आंदोलन करावे आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू अशी मागणी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.https://maharashtramirror.com/ Pune News
पुण्यात शास्त्री रस्ता अहिल्या अभ्यासिका येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला भेट देऊन सदाभाऊ यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. वर्णनात्मक परीक्षेमध्ये घोटाळा होत असल्याने ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्या, अशी विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून या सर्व मागण्या सकट सरकारने एमपीएससीच्या माध्यमातून तयार झालेल्या सर्व जागा भराव्या या, मात्र काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मागण्या मान्य केल्या आहेत, मात्र काही जण आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तरुणांना भडकावून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.https://maharashtramirror.com/ Pune News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर सार्थी किंवा महाज्योती अशा योजनांचा लाभ घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जाऊन भेटावे सरकारला विनाकारण घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन देखील सदाभाऊ खोत यांनी केले.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून चर्चेला तयार आहे. सरकार चर्चेला तयार असताना कुठलाही विषय ताणून धरणे योग्य नाही. आपण देखील यापूर्वी आंदोलने केली आहेत. मात्र त्यावेळी सरकार चर्चेला तयार नव्हते त्यामुळे आंदोलने करावी लागली, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला. पवार कुटुंब आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र रोहित पवार स्वतःचा राजकीय लाभ उठवण्यासाठी चुकीच्या प्रश्नावर ती आंदोलन करत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रामाणिकपणे आंदोलन करायचे असेल तर शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रतिक्विंटल उसाला भाव द्यावा आणि रयत शिक्षण संस्थेसारख्या पवारांच्या ताब्यात असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये एमपीएससीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची भरती व्हावी, यासाठी रोहित पवारांनी आंदोलन करावे असे आवाहन देखील सदाभाऊ खोत यांनी केले.




