Pune News : पुण्यात साकारतोय ‘साल्हेरचा रणसंग्राम’; छत्रपती शिवरायांच्या युद्धकथेची भव्य दुर्गप्रतिकृती पाहण्याची संधी
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मराठ्यांच्या शौर्यशाली इतिहासाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने इतिहासप्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने ‘साल्हेरचा रणसंग्राम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
1 मिनिट वाचन

Pune News :इतिहासप्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचा उपक्रम; ७ ते १५ नोव्हेंबरदरम्यान शनिवार पेठेत ऐतिहासिक प्रदर्शन
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मराठ्यांच्या शौर्यशाली इतिहासाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने इतिहासप्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने ‘साल्हेरचा रणसंग्राम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील शनिवार पेठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकथेवर आधारित भव्य दुर्गप्रतिकृती प्रदर्शन. साल्हेरच्या ऐतिहासिक रणसंग्रामाची शौर्यगाथा आणि मराठ्यांच्या युद्धकौशल्याची अनुभूती या प्रदर्शनाच्या माध्यमातून घेता येणार आहे. इतिहासप्रेमी, शिवप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ही एक विशेष पर्वणी ठरणार आहे. हे प्रदर्शन नवीन मराठी शाळा, शिंदे पारा जवळ, शनिवार पेठ, पुणे येथे भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० अशी आहे. शिवकालीन इतिहासाची भव्य मांडणी अनुभवण्यासाठी नागरिकांनी आणि इतिहासप्रेमींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




