मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धार्मिक उत्सवांचे पावित्र्य आणि परंपरा जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज असल्याचे मत लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी व्यक्त केले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे रोहित टिळक यांचे मत
धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे रोहित टिळक यांचे मत

रोहित टिळक यांचे मत

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धार्मिक उत्सवांचे पावित्र्य आणि परंपरा जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज असल्याचे मत लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात कर्णकर्कश डीजेच्या वाढत्या वापरामुळे निर्माण झालेल्या ध्वनिप्रदूषणाविरोधात नागरिक आणि विविध मंचांकडून सातत्याने निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. https://maharashtramirror.com/ Pune News

सध्या पुण्यात डीजेविरोधी आंदोलनांचे पर्व सुरू असून, लाउडस्पीकरविरोधी पुणेकर मंचच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक ते पुणे महापालिका यादरम्यान नुकताच एक मोठा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात शहर परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही बंदी केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न राहता, सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय मिरवणुका तसेच जयंत्या आणि पुण्यतिथींच्या वेळी वाजवल्या जाणाऱ्या कर्णकर्कश ध्वनिवर्धकांवर लागू करावी, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे. याबाबत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदनही सादर करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या सर्व घडामोडींवर भाष्य करताना रोहित टिळक म्हणाले की, “धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव हे समाजाला एकत्रित बांधून ठेवणारे अत्यंत प्रभावी माध्यम आहेत. या उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा वाढीस लागून परस्परांना मदत करण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे हे उत्सव उत्साहात साजरे झालेच पाहिजेत; परंतु याच आनंदाच्या काळात उत्सवांचे पावित्र्य आणि सर्वसामान्य नागरिकांची शांतता अबाधित राखणेही तितकेच गरजेचे आहे.” Pune News https://maharashtramirror.com/

धार्मिक उत्सवांमुळे माणसाला मानसिक आधार आणि एक आंतरिक सामाजिक ऊर्जा मिळते. श्रद्धा हा प्रत्येकाचा अत्यंत वैयक्तिक विषय असला, तरी कोणत्याही सर्वोच्च शक्तीसमोर नतमस्तक होण्याची भावना माणसाला नेहमी चांगले आचरण करण्याची आणि नैतिक मार्गाने चालण्याची प्रेरणा देते. मात्र, काळानुसार उत्सवांचे स्वरूप बदलत असताना त्यामध्ये अनावश्यक भपकेबाजी, कर्णकर्कश साऊंड सिस्टिम्स आणि वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या गोष्टी वाढीस लागणे चिंताजनक आहे. न्यायालयांनी आणि प्रशासनाने घातलेले निर्बंध हे कोणत्याही उत्सवाच्या विरोधात नसून, ‘उत्सवही थाटात साजरा व्हावा आणि नागरिकांना त्रास होऊ नये’ या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वादानरम्यान पुण्यात पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीकडे डीजेचा एक उत्तम आणि शिस्तबद्ध पर्याय म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांत ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनात विलक्षण शिस्त, नवनवीन ताल आणि उत्तम कोरिओग्राफीचा समावेश केला आहे. बहुतांश पथके प्रशासनाने घालून दिलेले नियम आणि ध्वनीमर्यादेचे तंतोतंत पालन करून आपले वादन सादर करत आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे पोलीस प्रशासनाने यापूर्वीच कर्णकर्कश डीजे, प्लाझ्मा स्क्रीन आणि प्रेशर साऊंडच्या वापरावर कडक निर्बंध कायम ठेवले असून, न्यायालयीन निर्देशांचे पालन करणे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. उत्सवांची समृद्ध परंपरा आणि श्रद्धा जपत असतानाच नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि ज्येष्ठांच्या विश्रांतीचा अधिकार सुरक्षित ठेवणे हीच खरी आपली खरीखुरी उत्सव संस्कृती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

शेअर करा