मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आठवले बरसले; म्हणाले, ‘नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करा’

Mumbai News : मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांच्यातील कथित मतभेदांमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आठवले बरसले; म्हणाले, ‘नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करा’
‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आठवले बरसले; म्हणाले, ‘नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करा’

Mumbai News : मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांच्यातील कथित मतभेदांमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. गेल्या दहा महिन्यांत मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि पुन्हा समाविष्ट करणे तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावृत्तीबाबत (SIR) संधू आणि विवेक जोशी यांनी किमान १४ वेळा अधिकृतपणे आक्षेप नोंदवल्याचा दावा केला जात आहे.
SIRच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरणही तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘कॉक्रोच जनता पार्टीने नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करावे’


दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या भूमिकेवर टीका केली. “राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आहे का? त्यांनी आपले नाव बदलून ‘राजीनामा जनता पार्टी’ करावे,” असा खोचक टोला आठवले यांनी लगावला.
यावेळी आठवले यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पाठराखण केली. ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरून निर्माण झालेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर SIR, मतदार याद्यांतील बदल आणि निवडणूक आयोगातील कथित मतभेद याबाबत पुढील काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा