राजाराम पुलाची १० मी. रुंदी वाढविणार
धायरी, माणिकबाग, आनंदनगर, सिंहगड रोड या भागाला फायदा होणार
1 मिनिट वाचन

धायरी, माणिकबाग, आनंदनगर, सिंहगड रोड या भागाला फायदा होणार
निलेश राऊत
पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील राजाराम पुलाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या पुलाची वाहतूक क्षमता थेट दुप्पट होणार आहे. या पुलाची १० मीटरने रुंदी वाढवून सहापदरी पुलाचे नियोजन केला जाणार असल्याने धायरी, माणिकबाग आणि आनंदनगर भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

सिंहगड रस्ता सर्वाधिक रहदारीचा मार्ग आहे. राजाराम पुलाची रुंदी अवधी १५ मीटर असल्याने सकाळी आणि विशेषतः सायंकाळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालकांना तासनतास मनस्ताप सहन करावा लागतो. त्यासाठी महापालिकेने पुलाची रुंदी १० मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे धायरी, माणिकबाग, आनंदनगर, सिंहगड रोड या भागाला फायदा होणार असून, या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होईल असे प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजरे म्हणाले.
कर्वेनगर भागातील वाढते नागरीकरण पाहता सध्याचा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे पुलाची रुंदी १० मीटरने वाढवून तो सहा पदरी केला जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल, असेही गोजरे यांनी सांगितले.
Rajaram Bridge to be widened by 10 m




