मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Railway Station Redevelopment बारामती रेल्वे स्थानकाचा ‘अमृत‘ विकास

पुणे, महाराष्ट्र मिरर Railway Station Redevelopment : बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्र

VZ
vidula zagade

3 मिनिट वाचन

Railway Station Redevelopment बारामती रेल्वे स्थानकाचा ‘अमृत‘ विकास

देशातील ७५ अत्याधुनिक रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण

बारामती आणि नांदुरा या पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचा समावेश

बारामती येथील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे, महाराष्ट्र मिरर Railway Station Redevelopment : बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. Railway Station Redevelopment

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी बारामती येथील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्याक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक उपस्थित होते. Railway Station Redevelopment

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा आधुनिकतेकडे वेगाने प्रवास सुरू असून जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही सेवा यामुळे भारतीय रेल्वे नव्या भारताच्या विकासाचे प्रतीक बनली आहे. अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारतसारखे उपक्रम हे त्या परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे.

देशातील आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी ७५ स्थानके राष्ट्राला समर्पित होत आहेत, ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मोठी गती मिळाली असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरेल. औद्योगिक क्षेत्राला वाहतूक सुविधा, कृषी उत्पादनांना बाजारपेठ, तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान स्मरणात ठेवून विकासाचा हा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळत असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचेच उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, या प्रकल्पात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून बारामतीकरांना या आधुनिक रेल्वे स्थानकाची स्वच्छता आणि सौंदर्य जपण्याचे आवाहन केले. या पुनर्विकासामुळे बारामतीच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी प्रास्ताविकात पुणे विभागातील रेल्वे स्टेशन्सचा अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास याचा आढावा सांगून बारामती रेल्वेचा इतिहास विशद केला आणि बारामती रेल्वे परिसरातील लोकांना उत्तम सेवा देईल असे सांगितले.

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुनर्विकसित रेल्वे स्थानकाची पाहणी केली. तसेच स्थानकावर थांबलेल्या रेल्वेत जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतले.

आधुनिक सुविधा आणि स्थानिक संस्कृतीचा पुर्नमिलाप

सुमारे साडे २६ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला असून त्यासाठी राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.स्थानकाच्या इमारतीमध्ये आधुनिक सुविधांसह स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब दिसेल अशी वास्तुरचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, आधुनिक प्रतिक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पुणे विभागीय रेल्वे मंडळाकडून बारामती येथील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञान या विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती. “विकसित रेल्वे स्थानकाचा भारत” आणि “विकसित भारत घडवण्यासाठी मी काय करेन” या विषयांवर झालेल्या स्पर्धांमध्ये एम.ई.एस. गजाननराव भीमराव देशपांडे विद्यालय, निर्मला हरिभाऊ प्राथमिक शाळा तसेच इतर शाळांतील एकूण २ हजार ८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Railway Station Redevelopment

शेअर करा