मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : राहुल गांधींचा साहिल वाकोडे यांच्या पालकांशी संवाद

Mumbai News : मुंबई : आयआयटी बॉम्बेचा दिवंगत विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या पालकांशी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

राहुल गांधींचा साहिल वाकोडे यांच्या पालकांशी संवाद
राहुल गांधींचा साहिल वाकोडे यांच्या पालकांशी संवाद

Mumbai News : मुंबई : आयआयटी बॉम्बेचा दिवंगत विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या पालकांशी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. साहिलच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या न्यायाच्या लढ्यात कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai news
राहुल गांधी यांनी साहिलचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली वाकोडे यांच्याशी सुमारे १७ मिनिटे संवाद साधला. त्यावेळी वाकोडे दाम्पत्य वाशिम जिल्ह्यातून मुंबईकडे प्रवास करत होते. या संवादावेळी इंडियन यूथ काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख शिवराज मोरे हे देखील साहिलच्या पालकांसोबत उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Mumbai news
साहिलच्या पालकांनी आपल्या मुलाला आयआयटी बॉम्बेमध्ये जातीय भेदभाव आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचा आरोप केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
साहिल हा आयआयटी बॉम्बेमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. १८ सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत आढळला. त्याच्या मृत्यूपूर्वी मिड-सेमेस्टर परीक्षेदरम्यान मोबाईलवर ChatGPT वापरल्याचा आरोप झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाच्या स्वतंत्र आणि सखोल चौकशीची मागणी होत आहे.
“साहिलच्या कुटुंबासोबत असून, न्यायासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,” असा विश्वास राहुल गांधी यांनी पालकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा