मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणेकरांना दिलासा! तूर्तास पाणीकपात नाही; महापालिकेकडून स्पष्ट माहिती

Pune News :पुणे : शहरात पाणीकपात होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पुणेकरांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणेकरांना दिलासा! तूर्तास पाणीकपात नाही; महापालिकेकडून स्पष्ट माहिती
पुणेकरांना दिलासा! तूर्तास पाणीकपात नाही; महापालिकेकडून स्पष्ट माहिती

Pune News :पुणे : शहरात पाणीकपात होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पुणेकरांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात तूर्तास कोणतीही पाणीकपात करण्यात येणार नसून, सध्या नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

राज्य सरकारकडून काही शहरी भागांमध्ये पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातही पाणीकपात लागू होणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सध्या पुण्यात पाणीकपात लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी पुण्यात सध्या पाणीकपात करण्यात आलेली नसल्याचे सांगितले. शासनाचा अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा, शहराची गरज आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबत महापालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे.

शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्त आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पुण्यात पाणीकपात लागू करायची की नाही, तसेच लागू केल्यास तिचे स्वरूप काय असेल, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना पाणीकपातीपासून दिलासा मिळाला असून, शहरातील पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. मात्र, शासनाच्या आगामी निर्णयानंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा