मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : नवरात्रीनिमित्त एसटी महामंडळाची ‘कोल्हार दर्शन’ एकदिवसीय सहल ; स्वारगेट आगाराचा उपक्रम प्रौढांसाठी १२००, तर महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी ८५० रुपये शुल्क

Pune News : पुणे : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगाराकडून भाविकांसाठी ‘कोल्हार दर्शन’ या एकदिवसीय आध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नवरात्रीनिमित्त एसटी महामंडळाची ‘कोल्हार दर्शन’ एकदिवसीय सहल ; स्वारगेट आगाराचा उपक्रम
नवरात्रीनिमित्त एसटी महामंडळाची ‘कोल्हार दर्शन’ एकदिवसीय सहल ; स्वारगेट आगाराचा उपक्रम

Pune News : पुणे : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगाराकडून भाविकांसाठी ‘कोल्हार दर्शन’ या एकदिवसीय आध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी स्वारगेट बसस्थानकातून या सहलीचे प्रस्थान होणार असून, नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या सहलीसाठी प्रौढ प्रवाशांना १२०० रुपये, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ८५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये चहा, उपवासाचे पदार्थ, पिण्याचे पाणी, पाण्याची बाटली आणि एक टोपी यांचा समावेश आहे. नवरात्रीच्या काळात भाविकांना धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

कोल्हार हे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक गाव असून, येथील रेणुका देवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या दर्शनासाठी येथे भाविक येतात. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने या सहलीला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी राजू (९९२३५६२५२४) किंवा संतोष (८१४९०२८००१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी स्वारगेट आगाराकडून करण्यात आले आहे. नवरात्रीनिमित्त आयोजित या सहलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा