Pune News : सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; चंदननगर पोलिसांत तक्रार
Pune News : पुणे : सोशल मीडियावर महामानव डॉ.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे : सोशल मीडियावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या छायाचित्रांचा वापर करून आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पोस्टमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
सचिन रोहिदास चव्हाण (वय ४३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहरचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी फेसबुक पाहत असताना ‘Agra Duniya’ या फेसबुक आयडीवरून संबंधित व्यक्तीने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. या पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार आणि स्टीफन हॉकिंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अपमानास्पद वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच पोस्टमध्ये धार्मिक आणि वैचारिक मुद्द्यांचा उल्लेख करून विशिष्ट समाजाबाबत गैरसमज, असंतोष, द्वेष व सामाजिक तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाचा मजकूर जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या पोस्टमुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, संबंधित व्यक्तीच्या कृत्यामुळे दोन समाज किंवा समुदायांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणी सचिन रोहिदास चव्हाण, सुनिता संजयकुमार गायकवाड आणि संजयकुमार गायकवाड यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सोशल मीडिया पोस्टची चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.




