मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्यात १ नोव्हेंबरला भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’;४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा

Pune News पुणे : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय एकता दिवसाचे’ औचित्य साधून रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात भव्य ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुण्यात १ नोव्हेंबरला भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’;४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा
पुण्यात १ नोव्हेंबरला भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’;४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा

Pune News : संयोजक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती; राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश

Pune News पुणे : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय एकता दिवसाचे’ औचित्य साधून रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात भव्य ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ४० हजारांहून अधिक पुणेकर सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री या उपक्रमाचे मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी दिली.https://maharashtramirror.com/ Pune News

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याबरोबरच नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विशेषतः युवा पिढीला व्यसनमुक्त, आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. यावेळी चितळे बंधूचे व्यवस्थापकीय संचालक इंद्रनील चितळे, लोकमान्यचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, अमूलचे विभागीय प्रमुख अतुल सुरू, ग्लोबल विभागीय व्यवस्थापक अजहर, अरविंद बिजवे, योगेश यावलकर, विशाल सातव उपस्थित होते.

देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस सन २०१४ पासून माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय भावनेतून पुण्यात आयोजित करण्यात येणारी ‘राष्ट्रीय एकता दौड’ ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून समाजातील सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणणारा व्यापक लोकसहभागाचा उपक्रम असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

गेल्या वर्षी २५ हजारांचा सहभाग; यंदा ४० हजारांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट

गेल्या वर्षी आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी २०२५’ला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या उपक्रमात २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १० हजारांहून अधिक स्पर्धात्मक धावपटूंनी १० किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला होता. केनिया, इथिओपिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह भारतातील नामांकित धावपटूंच्या सहभागामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

यंदाच्या उपक्रमासाठी आतापर्यंत २० हजारांहून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या असून, ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. यामध्ये व्यावसायिक धावपटू, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि कुटुंबीयांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

पाच विविध गटांत धावस्पर्धा; १० लाखांहून अधिक रोख पारितोषिके

‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’मध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनुभवी धावपटूंबरोबरच प्रथमच धावण्याच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनाही संधी मिळणार आहे.

स्पर्धात्मक धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गटांमध्ये एकूण १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पात्र महिला व पुरुष धावपटूंना स्पर्धेच्या नियमानुसार ही पारितोषिके प्रदान करण्यात येतील. यंदाही देश-विदेशातील नामांकित धावपटू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल, असे मोहोळ यांनी सांगितले.

‘नशामुक्त युवा – विकसित भारत’चा विशेष संदेश

यंदाच्या राष्ट्रीय एकता दौडचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘नशामुक्त युवा – विकसित भारत २०२६’ ही संकल्पना. तरुणाईमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबाबत जागरूकता निर्माण करून क्रीडा, व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.

‘नशामुक्त युवा – सशक्त युवा – विकसित भारत’ या विचारातून युवकांना व्यसनांपासून दूर ठेवत त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास, आरोग्याविषयी जागरूकता आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. निरोगी युवा पिढी हीच विकसित भारताची खरी ताकद असून, या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा