Pune: रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी
पुणे, महाराष्ट्र मिरर
1 मिनिट वाचन

Pune : जुन्या आरटीओ चौक ते नायडू हॉस्पिटलदरम्यान आज सकाळी एकाच वेळी अनेक वाहने घसरल्यामुळे मोठा साखळी अपघात घडला
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune : पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या मानण्यात येणाऱ्या जुन्या आरटीओ चौक ते नायडू हॉस्पिटलदरम्यान आज सकाळी एकाच वेळी अनेक वाहने घसरल्यामुळे मोठा साखळी अपघात घडला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साचलेला चिखल आणि वाहनांमधून सांडलेले ऑइल यामुळे हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सुमारे १५ वाहने अपघातग्रस्त झाली असून, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. pune rto chowk vehicles accident oil mud

प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर अचानक चिखल आणि ऑइल पसरल्यामुळे तब्बल २० ते २५ दुचाकीस्वार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावर घसरले. या सलग प्रकारामुळे परिसरामध्ये काही काळ मोठी तारांबळ उडाली. या अपघातांमध्ये अनेक वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून, काहींना तातडीने नजीकच्या उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
FRA च्या ‘बेकायदा’ शुल्कवाढीमुळे विद्यार्थी-पालकांना कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. प्रशासनाने तातडीने पावले उचलत रस्त्यावरील ऑइल आणि चिखल साफ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. रस्त्याची स्वच्छता करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Pune

सततच्या पावसामुळे आणि रस्त्यावरील तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या अशा अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल किंवा ऑइल सांडल्यामुळे वाहने घसरण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवावा आणि पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखून वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Pune

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




