मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : आरएमसी प्लांटवरील रात्रीच्या कामकाजावर बंदी

Pune News :पुणे: पुणे महानगरपालिका (मनपा) क्षेत्र आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर आणि प्रदूषण पसरवणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट्सवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता आरएमसी असोसिएशनने आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

आरएमसी प्लांटवरील रात्रीच्या कामकाजावर बंदी
आरएमसी प्लांटवरील रात्रीच्या कामकाजावर बंदी

Pune News : नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर आरएमसी असोसिएशनची आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात

Pune News :पुणे: पुणे महानगरपालिका (मनपा) क्षेत्र आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर आणि प्रदूषण पसरवणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट्सवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता आरएमसी असोसिएशनने आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांकडे स्थानिक नागरिकांनी केलेल्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, असोसिएशनने आपल्या सर्व सदस्यांसाठी कठोर नियमावली व आचारसंहिता लागू केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पुण्यातील महंमदवाडी, उंड्री, पिसोळी, एनआयबीएम अ‍ॅनेक्स, बालेवाडी आणि कस्पटे वस्ती यांसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये आरएमसी प्लांट्सची संख्या मोठी आहे. या प्लांट्समधून उडणारी साचलेली धूळ आणि रात्रंदिवस चालणाऱ्या अवजड यंत्रसामग्रीचा मोठा आवाज यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नागरिकांनी थेट महानगरपालिका आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी नोंदवल्यानंतर, महापालिका प्रशासनाने स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, "केवळ परवाने आणि परवानग्या असणे म्हणजे प्रदूषणाचे लायसन्स नव्हे." प्रत्यक्ष कामकाजात प्रदूषण आढळल्यास अधिकृत असणाऱ्या प्लांट्सवरही टाळे ठोकले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि सचिव डॉ. सचिन काटे यांनी सर्व प्लांट मालक व चालकांना तातडीने खालील उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.

संपूर्ण प्लांट परिसर उंच पत्रे आणि उच्च गुणवत्तेच्या ग्रीन नेटने पूर्णपणे झाकून घेणे अनिवार्य आहे. साठवलेला कच्चा माल (रेती, खडी, सिमेंट) हाताळताना नियमित पाण्याने फवारणी करावी. प्लांट्सच्या अंतर्गत रस्त्यांवर आणि वाहनांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर दिवसातून अनेकदा पाण्याचा फवारा मारून धूळ कमी करावी.

रात्रीच्या कामकाजावर मर्यादा
परिसरातील रहिवाशांच्या झोपेचा विचार करून रात्री ८:०० ते सकाळी ६:०० या वेळेत प्लांटचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवावे. रात्रीच्या वेळी वाहनांची होणारी गर्दी, मिक्सरच्या ड्रमचा आवाज आणि साहित्याची चढ-उतार टाळावी. मिक्सर आणि इतर मशनरीची वेळेवर दुरुस्ती करून अनावश्यक आवाज कमी करावा. सायलेंसर आणि साऊंड-प्रुफ बॅरियर्सचा वापर वाढवावा.

सध्या आरएमसी उद्योगासाठी अधिकृत मानक कार्यपद्धतीअद्याप प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या अचानक कारवायांमुळे संपूर्ण उद्योगात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही प्रशासनाकडून उद्योगासाठी न्याय्य आणि सुसंगत एसओपीची मागणी करत आहोत. परंतु, प्रशासनाकडे मागणी करताना आपण स्वतः आधी शिस्त पाळली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांना कोणताही त्रास न होऊ देणे ही आपली पहिली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. काही निष्काळजी प्लांट चालकांमुळे संपूर्ण आरएमसी उद्योगाची बदनामी होता कामा नये. अशी भूमिका पुणे आरएमसी असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन काटे यांनी मांडली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा