मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : रविवार पेठेत दुकान फोडून चोरी;चोरट्यांकडून एक लाखांचे पितळी साहित्य लंपास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : रविवार पेठेतील बंद दुकानाची खिडकी फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीचे पितळी साहित्य चोरून नेले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

रविवार पेठेत दुकान फोडून चोरी;चोरट्यांकडून एक लाखांचे पितळी साहित्य लंपास
रविवार पेठेत दुकान फोडून चोरी;चोरट्यांकडून एक लाखांचे पितळी साहित्य लंपास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : रविवार पेठेतील बंद दुकानाची खिडकी फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीचे पितळी साहित्य चोरून नेले. धनलक्ष्मी मेंटल इंडस्ट्रीज या दुकानात ही घरफोडी झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रविवार पेठेतील हे दुकान बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पितळेचे कान आणि कडे असलेली दोन पोती चोरून नेली. चोरी झालेल्या साहित्याची किंमत एक लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी शितलादेवी चौक परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ आणि ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस अंमलदार भोसले करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा