मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : रॅपीडो’ बाईक टॅक्सी विनापरवाना; आरटीओकडून नागरिकांना अ‍ॅप न वापरण्याचे आवाहन

Pune News :पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

रॅपीडो’ बाईक टॅक्सी विनापरवाना; आरटीओकडून नागरिकांना अ‍ॅप न वापरण्याचे आवाहन
रॅपीडो’ बाईक टॅक्सी विनापरवाना; आरटीओकडून नागरिकांना अ‍ॅप न वापरण्याचे आवाहन

Pune News :पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. ‘रॅपीडो’ (Rapido) या कंपनीकडे बाईक टॅक्सी चालवण्यासाठी कोणताही वैध आणि अधिकृत अॅग्रीगेटर परवाना (लायसन्स) नाही.
विनापरवाना सुरू असलेल्या या सेवेमुळे नागरिकांनी ‘रॅपीडो’चे बाईक टॅक्सी ॲप अजिबात वापरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गुरूवारी (दि.१५)जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, रॅपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपीडो) कंपनीला परवाना मिळेपर्यंत बाईक टॅक्सी संचालन तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. https://maharashtramirror.com/ Pune News

तथापि विनापरवाना व्यवसाय सुरू ठेवल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश होते. परंतु, आदेशाचे उल्लंघन करून रॅपीडोने आपले ॲप सुरू ठेवल्यामुळे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शुक्रवारी (दि.१६)कंपनीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, कंपनीचे ॲप ब्लॉक करण्याची कारवाई देखील प्रक्रियेत आहे. आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वाहन मालकांनी आपली खाजगी दुचाकी रॅपीडो ॲपवर ऑनबोर्ड करू नये. तपासणीदरम्यान असे वाहन विनापरवाना प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास, संबधित वाहन मालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर अडचणीत येऊ नये म्हणून नागरिकांनी व वाहनधारकांनी रॅपीडो ॲपचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा