Pune News : एल निनोचा अंदाज, पण पुण्याच्या घाटात पावसाचा धुमाकूळ; ताम्हिणीत ९ हजार ११३ मिमी पाऊस
Pune News : पुणे: यंदा पाऊस कमी पडणार, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती.
2 मिनिट वाचन

Pune News : पुणे: यंदा पाऊस कमी पडणार, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. एल निनोच्या प्रभावामुळे देशासह महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात पुण्याच्या घाट परिसरात मात्र याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ताम्हिणी, लोणावळा, मुळशी आणि शिरगावसह रायगडमधील भिरा परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. भिरा इथे तब्बल ९ हजार ८३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ताम्हिणीतही ९ हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात मात्र अशी नव्हती. जूनमध्ये पुणे परिसरात पावसाचं प्रमाण कमी राहिलं. मान्सूनच्या आगमनालाही काहीसा विलंब झाला. त्यामुळे सुरुवातीला पावसाची तूट निर्माण झाली होती पण जुलैमध्ये पावसाने अचानक जोर पकडला.https://maharashtramirror.com/ Pune News
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकापाठोपाठ हवामान प्रणाली तयार झाल्या. त्याचा परिणाम म्हणून मान्सून सक्रिय झाला आणि सह्याद्रीच्या घाट परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांमध्ये तर कमी कालावधीतच प्रचंड पाऊस झाला.या भागातील यंदाची पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिली तर,भिरा — ९,८३३ मिलिमीटर,ताम्हिणी — ९,११३ मिलिमीटर,शिरगाव — ७,३९२ मिलिमीटर,लोणावळा — ५,७९६ मिलिमीटर,आणि मुळशी मध्ये ३,३३६ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
यामध्ये ताम्हिणीची आकडेवारी विशेष आहे. कारण गेल्या तीन वर्षांपासून ताम्हिणीत सातत्याने ९ हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होत आहे.२०२४ मध्ये ताम्हिणीत ९ हजार ६४४ मिलिमीटर पाऊस झाला होता.२०२५ मध्ये हा आकडा ९ हजार १०९ मिलिमीटर होता.तर २०२६ मध्ये ९ हजार ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.म्हणजेच, सलग तीन वर्षे ताम्हिणीमध्ये ९ हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
आता प्रश्न आहे, एल निनोचा प्रभाव असतानाही पुण्याच्या या भागात एवढा पाऊस का झाला?यामागे सह्याद्रीची भौगोलिक रचना आणि यंदाच्या मान्सूनमधील हवामान प्रणाली महत्त्वाच्या ठरल्या. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे वरच्या दिशेने ढकलले जातात. त्यामुळे घाट परिसरात आधीपासूनच पावसाचं प्रमाण जास्त असतं.यंदा जुलैमध्ये निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे या भागात पावसाची तीव्रता आणखी वाढली. त्यामुळे जूनमधील पावसाची तूट काही भागांत भरून निघाली आणि काही ठिकाणी सरासरीपेक्षाही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.विशेष म्हणजे, पुणे परिसरात कमी पावसाचा अंदाज असतानाच पुण्याच्या अगदी जवळ असलेल्या घाट भागाने मात्र यंदा पावसाचे विक्रमी आकडे गाठले आहेत. त्यामुळे एल निनोचा प्रभाव असला, तरी पावसाचं वितरण संपूर्ण राज्यात एकसारखं राहिलं नाही, हे यंदाच्या पावसाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतं.




