मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune news : कोजागरी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली राहणार

Pune news :पुणे: पुणेकरांना चांदण्यांच्या प्रकाशात आणि निसर्गाच्या सान्निध्यात कोजागरी पौर्णिमेचा आनंद घेता यावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कोजागरी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली राहणार
कोजागरी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली राहणार

Pune news :पुणे: पुणेकरांना चांदण्यांच्या प्रकाशात आणि निसर्गाच्या सान्निध्यात कोजागरी पौर्णिमेचा आनंद घेता यावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील सर्व २१६ सार्वजनिक उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची घोषणा पालिका प्रशासनाने केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६६(१०) अन्वये सार्वजनिक आज, बागा आणि मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, तसेच नागरिकांना सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीसाठी विरंगुळ्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची वैधानिक जबाबदारी आहे. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून शहराच्या विविध भागांत २१६ हून अधिक लहान-मोठी उद्याने विकसित व देखभाल केली जातात. रोजच्या धावपळीतून वेळ काढून नागरिक, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच देश-परदेशातील पर्यटक या उद्यानांना मोठ्या संख्येने भेट देतात. सामान्यत: शहरातील रात्री ८ किंवा ९ वाजेपर्यंत खुली असतात. मात्र, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी नागरिक कुटुंबीयांसह एकत्र येऊन चंद्रदर्शन घेतात. ही बाब विचारात घेऊन उद्यान विभागाने २५ ऑक्टोबर रोजी उद्यानांच्या वेळेत विशेष वाढ केली आहे. या दिवशी सार्वजनिक उद्याने सकाळी ६:०० ते ११:०० या नियमित वेळेत आणि सायंकाळी ४:०० ते थेट रात्री १२:०० वाजेपर्यंत खुली राहतील.

शरद ऋतूतील कोजागरी पौर्णिमेची रात्र ही विशेष मानली जाते. या रात्री लखलखणाऱ्या चांदण्यात आणि शीतल चंद्रप्रकाशात वेळ घालवणे हा पुणेकरांचा एक लाडका उपक्रम असतो. पालिकेच्या या निर्णयामुळे पुणेकरांना शहरातील हिरवळीवर, उद्यानातील शांत वातावरणात आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत कोजागरी साजरी करता येणार आहे.

उद्यान विभागाचे सह महापालिका आयुक्त डॉ. अशोक दि. घोरपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले की, नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रसन्न वातावरणात सणाचा आनंद घेता यावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे. सर्व पुणेकर नागरिकांनी महापालिकेच्या या विशेष सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी उद्यान विभागाच्या वतीने केले आहे.दरम्यान, उद्यानांमध्ये स्वच्छता राखणे, झाडे-झुडपे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करणे आणि शिस्त पाळणे याबाबतही प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याची विनंती करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा