मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : प्रेमविवाह की फसवणूक? सहकारनगर पोलीस ठाण्यात पीएसआय पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime :पुणे: पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात एका तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षकावर (पीएसआय) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

प्रेमविवाह की फसवणूक? सहकारनगर पोलीस ठाण्यात पीएसआय पतीविरुद्ध गुन्हा दाखल
प्रेमविवाह की फसवणूक? सहकारनगर पोलीस ठाण्यात पीएसआय पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime : हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणे तसेच वारंवार मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा

Pune Crime :पुणे: पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात एका तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षकावर (पीएसआय) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणे तसेच वारंवार मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, पीडित ३१ वर्षीय महिला २००२ ते २०२३ या कालावधीत शनिवार पेठेतील एका लायब्ररीमध्ये एमपीएससीची तयारी करत असताना राहुल शेषेराव राठोड (वय २९, रा. जयराम तांडा, गेवराई, बीड) याच्या संपर्कात आली होती. दोघांमधील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि घरच्यांच्या संमतीने लग्न ठरले. या दरम्यान तरुणाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रवासात तरुणीने त्याला सर्वतोपरी मानसिक, आर्थिक व शारीरिक मदत केली. त्याच्या मैदाणी चाचणीदरम्यान मसल टियर झाल्यामुळे त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी आणि खात्यातून सुमारे २ लाख २० हजार रुपयांची आर्थिक मदतही केली. १ ऑगस्ट २०२४ रोजी राहुलची एमपीएससीमधून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. मात्र, गावात मिरवणुकीदरम्यान ‘मुलगी आपल्या जातीची नाही’ अशी चर्चा सुरू झाल्यानंतर त्याचे वर्तन बदलले.

त्याने पीडितेला सोशल मीडियावर ब्लॉक केले आणि २५ मे २०२५ रोजी नाते संपल्याचे सांगून घरच्यांच्या पसंतीने दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. या फसवणुकीविरोधात तरुणीने स्वारगेट आणि महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर दबावापोटी १२ सप्टेंबर २०२५ रोजी आळंदी येथील मंगल कार्यालयात दोघांचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतरही पती राहुल राठोड आणि त्याच्या नातेवाईकांकडून फ्लॅट, फोर व्हीलर गाडी व हुंड्यासाठी सतत पैशांची मागणी केली जाऊ लागली. मागणी पूर्ण न झाल्यास तो तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असे. इतकेच नव्हे तर, राहत्या फ्लॅटवर खोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मारहाण केल्याचा बनाव रचल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

या सर्व प्रकारामुळे नैराश्यात आलेल्या पीडितेने अखेर सहकारनगर पोलीस ठाण्यात येऊन कायदेशीर फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी पती राहुल राठोड आणि त्याच्या दाजीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह हुंडाबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा