मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवरून संदीप खर्डेकर आक्रमक

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील रस्त्यांची झालेली दैननीय अवस्था, खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यातून उद्भवणाऱ्या नागरिक व वाहनचालकांच्या हालअपेष्टांवरून क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवरून संदीप खर्डेकर आक्रमक
रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवरून संदीप खर्डेकर आक्रमक

Pune News : मनपा आयुक्तांना दुचाकीवरून पाहणी फेरी काढण्याचे आव्हान

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील रस्त्यांची झालेली दैननीय अवस्था, खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यातून उद्भवणाऱ्या नागरिक व वाहनचालकांच्या हालअपेष्टांवरून क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्य रस्त्यांसह शहरातील गल्लीबोळांतील रस्त्यांची पुनर्बांधणी करावी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना एसी गाड्यांऐवजी दुचाकीवरून फिरण्यास भाग पाडून पाहणी अहवाल तयार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

'पुणे गेले खड्ड्यात'

पत्रात खर्डेकर यांनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. केवळ डांबर आणि खडी टाकून खड्डे बुजवणे हा तात्पुरता मार्ग असून यात कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे. रस्ते खरवडून (milling), त्यावर योग्य ग्राउटिंग करून मगच दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे. एमएनजीएल आणि २-४x७ पाणीपुरवठा खोदाई अशा विविध योजनांच्या खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करताना अत्यंत हलगर्जीपणा झाला असून या कामांमुळे रस्त्यांची मोठी चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, जेन झी व जेन अल्फा या सर्वांनाच कंबरदुखी व मानदुखीच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

'अधिकाऱ्यांच्या चारचाकी गाड्या काढून घ्या'

प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवत खर्डेकर यांनी आयुक्तांसमोर अनोखा प्रस्ताव ठेवला आहे. "बहुतांश मनपा अधिकारी चारचाकी वाहनांतून फिरत असल्यामुळे त्यांना पादचारी आणि दुचाकीस्वारांचे दुःख कळत नाही," असा आरोप करत त्यांनी महिनाभरासाठी सनदी अधिकाऱ्यांसह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची चारचाकी वाहने काढून घेऊन त्यांना दुचाकीवरून फिरावे. रस्त्यांच्या भीषण दुर्दशेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पुनर्बांधणीचा (Reconstruction) आराखडा सादर करावा. मुख्य रस्त्यांप्रमाणेच सर्व गल्लीबोळांतील खड्ड्यांची यादी करून तिथल्या डांबरीकरणाचे वेळापत्रक जाहीर करावे. अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News

"पुणे ग्रँड चॅलेंज टूर सारख्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जर मुख्य रस्ते चकाचक होऊ शकतात, तर नियमित कर भरणाऱ्या सामान्य पुणेकरांसाठी गल्लीबोळातील रस्ते चांगले का असू शकत नाहीत?" असा सवाल खर्डेकर यांनी उपस्थित केला आहे. केवळ सुशोभीकरणावर निधी उधळण्यापेक्षा रस्ते राहण्यायोग्य करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

शेअर करा