मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पुणे पोर्शे अपघात प्रकरण: 18 महिन्यांनंतर तिन्ही प्रमुख आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Porsche Case : पालकांनी मुलांना पैसे अन् चाव्या देण्यापेक्षा वेळ द्यावा'; जामीन मंजूर करताना न्यायालयाचे परखड ताशेरे

V
Vivek

1 मिनिट वाचन

पुणे पोर्शे अपघात प्रकरण: 18 महिन्यांनंतर तिन्ही प्रमुख आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Porsche Case : पालकांनी मुलांना पैसे अन् चाव्या देण्यापेक्षा वेळ द्यावा'; जामीन मंजूर करताना न्यायालयाचे परखड ताशेरे

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रक्ताचे नमुने बदलल्याचा (Blood Sample Swapping) गंभीर आरोप असलेल्या तीन प्रमुख आरोपींना न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. सुमारे 18 महिने तुरुंगात राहिल्यानंतर या तिघांची आता कारागृहातून सुटका होणार आहे.

न्यायालयाने कोणाला दिला जामीन?

न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील खालील तिघांना जामीन दिला आहे.

1.आदित्य अविनाश सूद: कारमध्ये मागे बसलेल्या मुलाचे वडील.

2.आशिष सतीश मित्तल: मुख्य आरोपीच्या वडिलांचा मित्र.

3.अमर संतोष गायकवाड: रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच घेणारा कथित मध्यस्थ.

'पालकांकडे मुलांसाठी वेळ नाही'; कोर्टाची गंभीर टिप्पणी

जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने पालकांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, "मुलांना चैनीसाठी अमाप पैसे आणि महागड्या गाड्यांच्या चाव्या देणे पूर्णतः चुकीचे आहे. आजच्या काळात पालकांकडे मुलांसाठी वेळ नसतो आणि ते त्याची भरपाई पैशांच्या स्वरूपात करतात, हे सामाजिक वास्तव चिंताजनक आहे." आरोपी 18 महिन्यांपासून कोठडीत असून शिक्षेचे स्वरूप पाहता त्यांना अधिक काळ तुरुंगात ठेवणे अन्यायकारक ठरेल, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

नेमके प्रकरण काय होते?

19 मे 2024 रोजी रात्री पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन बिल्डर पुत्राने मद्यधुंद अवस्थेत सुसाट पोर्शे कार चालवत अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुण आयटी इंजिनीअर्सना चिरडले होते. या अपघातानंतर मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली वरील तिघांना अटक करण्यात आली होती.

शेअर करा