मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने दुर्दैवी निधन

Pune News : पुणे, : शहर पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, हुशार आणि धाडसी कर्मचारी अशी ओळख असलेले पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे (वय ५०) यांचे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने दुर्दैवी निधन
गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने दुर्दैवी निधन

Pune News : पुणे, : शहर पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, हुशार आणि धाडसी कर्मचारी अशी ओळख असलेले पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे (वय ५०) यांचे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सहकाऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बंदोबस्तानाच्या तणावातून पुण्यात पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे हे मूळचे हडपसर परिसरातील रहिवासी होते. त्यांची मूळ नेमणूक वानवडी पोलीस ठाण्यात होती, तर सध्या ते पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहा (गोपनीय) विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. गोपनीय विभागात काम करताना त्यांनी अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत कौशल्याने पार पाडल्या होत्या. गुरुवारी (२४ सप्टेंबर) रात्री गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताचे आणि दैनंदिन कामकाजाचे काम आटोपून ते घरी गेले होते. https://maharashtramirror.com/ Pune News

शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास, हडपसर येथील आपल्या निवासस्थानाजवळ असलेल्या स्थानिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी तेलंगे नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसले होते. संवाद सुरू असतानाच त्यांना अचानक तीव्र चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कसलाही विलंब न करता त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात अहोरात्र चालणारा ताणतणाव आणि कडक बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर, एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा असा अचानक झालेला मृत्यू पोलीस दलाला चटका लावून गेला आहे. संयमी स्वभाव, कामावरील निष्ठा आणि धाडसी वृत्ती यामुळे तेलंगे यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने तेलंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा