मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पीएमपीएमएल बसला आग; अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : अग्निशमन दलाचे जवान नेहमीच सतर्क राहून जीवित आणि वित्तहानी टाळण्याचे कर्तव्य चोख बजावत असतात.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पीएमपीएमएल बसला आग; अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
पीएमपीएमएल बसला आग; अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : अग्निशमन दलाचे जवान नेहमीच सतर्क राहून जीवित आणि वित्तहानी टाळण्याचे कर्तव्य चोख बजावत असतात. अग्निशमन दलाच्या जवानाच्या सतर्कतेमुळे असाच एक अनर्थ टळला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

कसबा अग्निशमन केंद्र येथील जवान सुरेश पवार हे रात्रपाळी ड्युटी करुन काळेवाडीकडे दुचाकीवरून घरी जात असताना शिवाजीनगर चौकात पुणे स्टेशन ते निगडीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे निदर्शनास येताच पवार यांनी तत्काळ चालकाला सांगून बस थांबवत दलाच्या नियंत्रण कक्षात कळवले.https://maharashtramirror.com/ Pune news

कसबा अग्निशमन वाहन येईपर्यंत चालक, वाहक व पवार यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले होते. अग्निशमन वाहन पोहोचताच आगीवर पाण्याचा मारा करीत आग पुर्ण विझवत धोका दूर केला. अग्निशमन जवानाने प्रसंगावधान राखून केलेली कार्यवाही यामुळे मोठी दुर्घटना टळली.

प्रवाशांनी अग्निशमन जवान व चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करीत अग्निशमन विभागाच्या उत्तम कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा