मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : गणेशमूर्ती पुनर्विसर्जनासाठी खाण भाड्याने

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत पुणे महापालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्ती तसेच दुर्गादेवीच्या मूर्तींचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यासाठी खाण भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गणेशमूर्ती पुनर्विसर्जनासाठी खाण भाड्याने
गणेशमूर्ती पुनर्विसर्जनासाठी खाण भाड्याने

Pune News : १५ लाखांवरून दर थेट साडेबारा लाखांवर; गणेशोत्सव-नवरात्रासाठी २५ दिवसांची व्यवस्था

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत पुणे महापालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्ती तसेच दुर्गादेवीच्या मूर्तींचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यासाठी खाण भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी मागविण्यात आलेल्या कोटेशनमध्ये सर्वांत कमी दर देणाऱ्या भावडी येथील खाणमालक सोमनाथ तांबे यांच्याकडून २५ दिवसांसाठी खाण घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देत सुरुवातीला १५ लाख रुपये दर सादर करणाऱ्या खाणमालकाने चर्चेनंतर हा दर कमी करून १२ लाख ५० हजार रुपये केल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News

खाणमालकाशी वाटाघाटी करून दर केले कमी

गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी खाण उपलब्ध करून घेण्यात आली आहे. दर कमी करण्यासाठी महापालिकेने संबंधित खाणमालकाशी चर्चा केली. त्यानंतर तांबे यांनी १५ लाख रुपयांचा दर कमी करून १२ लाख ५० हजार रुपये इतका फेरदर सादर केला. दरवर्षी खाणीच्या भाड्यात सुमारे १५ टक्के वाढ होत असते. मागील वर्षी दरवाढ न झाल्याने यंदा दोन वर्षांची वाढ तसेच दुर्गादेवी महोत्सवासाठी वाढणारे पाच दिवस विचारात घेऊन १५ लाख रुपयांचे कोटेशन दिल्याचे त्यांनी महापालिकेला कळविले. मात्र, महापालिकेचा विचार करून कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविली.

गणेशोत्सव आणि दुर्गादेवी महोत्सव हा संवेदनशील विषय असल्याने पुनर्विसर्जनाची व्यवस्था वेळेत करणे आवश्यक आहे. त्यामुळे १२ लाख ५० हजार रुपयांच्या फेरसादर दरानुसार खाण भाडेतत्त्वावर घेण्यास हरकत नसल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. या कामासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे आवश्यक तरतूद उपलब्ध आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा