मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर प्रशासनाचा बडगा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात आग आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिका प्रशासन आता अधिक कठोर झाले असून, अग्निसुरक्षा व बांधकामविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुण्यात अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर प्रशासनाचा बडगा मांगडेवाडीतील विनापरवाना कंपनी सील
पुण्यात अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर प्रशासनाचा बडगा मांगडेवाडीतील विनापरवाना कंपनी सील

Pune News : मांगडेवाडीतील विनापरवाना कंपनी सील

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात आग आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिका प्रशासन आता अधिक कठोर झाले असून, अग्निसुरक्षा व बांधकामविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिलेल्या सक्त आदेशांनुसार, अग्निशमन दल आणि बांधकाम विभागाने संयुक्त मोहीम राबवत मागील सात दिवसांत तब्बल ३४४ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आज मांगडेवाडी परिसरातील एका मोठ्या उत्पादक कंपनीवर कारवाई करत ती बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

आज मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धनकवडी क्षेत्रीय कार्यालय प्रमुख, कार्यकारी अभियंता आणि संबंधित पथकाने मांगडेवाडी येथील सोलर इन्व्हर्टर व ईव्ही चार्जर उत्पादक कंपनीची अचानक पाहणी केली. सुमारे २६६२ चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेल्या या कारखान्यात सोलर आणि सौर उपक्रमांशी संबंधित उपकरणांची असेंब्ली, चाचणी, साठवणूक व पॅकेजिंगचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून आले; परंतु या युनिटकडे कोणत्याही कायदेशीर परवानग्या नसल्याचे तपासात उघड झाले. कंपनीच्या प्रतिनिधींना पर्यावरण, सांडपाणी, वैध अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र, मंजूर बांधकाम नकाशा, बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला किंवा भोगवटा प्रमाणपत्र यापैकी एकही कागदपत्र सादर करता आले नाही. https://maharashtramirror.com/ Pune News

कारखान्याच्या आतील पाहणीमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील आणि आगीच्या दृष्टीने धोकादायक मालाचा साठा आढळून आला. विशेष म्हणजे, या ठिकाणी आपत्काळी बाहेर पडण्याचा मार्ग, अग्निरोधक उपकरणे किंवा कोणतीही स्थायी व अस्थायी अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आलेली नव्हती. मानवी जीविताशी खेळ करणाऱ्या या गंभीर त्रुटींमुळे महापालिकेने तातडीने पावले उचलली आहेत.

आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या उपलब्ध नसल्‍यामुळे बांधकाम विभागामार्फत सदर कारखाना पुढील आदेश होईपर्यंत सील करण्याची कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच, मिळकतीची हद्द, मालकी, प्रॉपर्टी आयडी, मंजूर वापर आणि कर आकारणीची स्वतंत्र पडताळणी संबंधित विभागांकडून केली जात आहे. नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास प्रचलित अधिनियम व नियमांनुसार कठोर वैधानिक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.

गेल्या अवघ्या सात दिवसांत पुणे शहरात पीजी होस्टेल, क्लासेस, भंगार मालाची गोडाऊन, रुग्णालय आणि इतर विनापरवाना ३४४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात अनधिकृतपणे आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांवरच गदा आणण्यासाठी ही मोहीम अशीच तीव्र स्वरूपात सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आजच्या या धडक कारवाई मोहिमेवेळी मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष लांजेकर, स्टेशन ड्युटी ऑफिसर प्रभाकर उम्राटकर, प्रभारी उपअग्निशमन अधिकारी वसंत भिलारे व निलेश महाजन, क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता राऊत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांवर हयगय केली जाणार नाही, असा संदेश या कठोर कारवाईतून देण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा