मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : विजेच्या खांब चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेत गुरुवारी झालेल्या मुख्य सभेत ऑगस्ट मध्ये पालिकेचे कथित विजेचे खांब चोरी केल्याच्या घटनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

विजेच्या खांब चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...
विजेच्या खांब चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

Pune Crime : सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर गंभीर आरोप

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेत गुरुवारी झालेल्या मुख्य सभेत ऑगस्ट मध्ये पालिकेचे कथित विजेचे खांब चोरी केल्याच्या घटनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चोरी झालेले खांब हे पालिकेच्या ताब्यात असतानादेखील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर 'चोर चोर' असा आरोप करत भर सभेत गदारोळ केला. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा नवे वळण लागले आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

पुणे महानगरपालिकेचे वीजखांब दिवसाढवळ्या चोरून ते भंगारात विकल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली. कोंढवा खुर्द येथील मिठानगर आणि नवाजिश चौक परिसरात महापालिकेचे स्ट्रीट लाईटचे खांब काढून ते थेट भंगारात विकण्यासाठी वाहनातून नेण्यात आल्याचा आरोप एका स्थानिक महिलेने नगरसेवक गफुर पठाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर केला होता. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime

मात्र, पठाण यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावत पालिकेचे खांब हे ओटा मार्केटमध्ये ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. विशेष बाब म्हणजे हे मार्केट पुणे महानगरपालिकेचेच आहे. तरीदेखील एक महिन्यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. सभा तहकूब केली.https://maharashtramirror.com/ Pune crime

महापालिकेचे खांब गेले कुठे? असा सभागृहात सवाल उपस्थित करत खांबचोरीतील दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी भाजप नगरसेवकांनी थेट महापौरांसमोर उभे राहत केली. यावेळी सभागृहात चांगलाच गदारोळ माजला.


पालिकेत सुरु असलेल्या मुख्य सभेत गेल्या ७ वर्षांपासून रखडलेला कात्रज कोंढवा रस्त्याचा मार्गावरुन रणकंदन सुरु होते. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनातील दिरंगाई आणि रस्त्याची रुंदी कमी करण्याच्या प्रशासकीय निर्णयावरून विरोधक नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत प्रश्नांची सरबत्ती केली होती. यावर महापौर आणि सभागृहातील सर्व सदस्यांना आश्वस्त करताना आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाची भूमिका अत्यंत सविस्तरपणे मांडली. यावेळी त्यांनी रस्त्याचे काम २०२७ मार्च पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही दिली. त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असता सत्ताधाऱ्यांकडून कथित विजेच्या खांब चोरीचा मुद्दा उपस्थित करत मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधाऱ्यांची ही भूमिका पाहता पालिकेच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही तेच स्पष्टीकरण


ज्या दिवशी विजेचे खांब चोरीचे प्रकरण समोर आले त्याचवेळी क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याची तपासणी केली. तर पालिकेकडूनच ते खांब काढण्यात आले असून त्याच्या जागी नविन खांब बसवण्यात आले. काढण्यात आलेले पोल हे ओटा मार्केट येथे ठेवण्यात आले आहेत.

शेअर करा