मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : 'मला कोण धमकी देणार?', त्या चर्चेवर आयुक्तांचे घुमजाव

*नवलकिशोर राम यांनी सुरुवातीला धमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला होता https://maharashtramirror.com/ Pune News *काही तासांनंतर प्रतिक्रिया घेतली असता 'मला कोण धमकी देणार?' असा उलट सवाल विचारत त्यांनी अधिक बोलणे टाळले *वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने रस्ता विकसित होणार आहे *सदर रस्त्याच

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

'मला कोण धमकी देणार?', त्या चर्चेवर आयुक्तांचे घुमजाव ९० कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मर्जीतील ठेकेदाराला मिळण्यासाठी भाजपच्या आमदाराची महापालिका आयुक्तांना धमकी
'मला कोण धमकी देणार?', त्या चर्चेवर आयुक्तांचे घुमजाव ९० कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मर्जीतील ठेकेदाराला मिळण्यासाठी भाजपच्या आमदाराची महापालिका आयुक्तांना धमकी

Pune News : ९० कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मर्जीतील ठेकेदाराला मिळण्यासाठी भाजपच्या आमदाराची महापालिका आयुक्तांना धमकी

महत्वाचे मुद्दे


*नवलकिशोर राम यांनी सुरुवातीला धमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला होता https://maharashtramirror.com/ Pune News
*काही तासांनंतर प्रतिक्रिया घेतली असता 'मला कोण धमकी देणार?' असा उलट सवाल विचारत त्यांनी अधिक बोलणे टाळले
*वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने रस्ता विकसित होणार आहे
*सदर रस्त्याचे काम मर्जीतील ठेकेदाराला देण्यासाठी सत्ताधारी आमदाराचा दबाव
*निविदेत ८ ठेकेदारांनी सहभाग घेतला
*राजकीय हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया तब्बल ६ ते ७ महिने ठप्प
*मर्जीतील ठेकेदाराला काम न मिळाल्यामुळे आमदारांचा संताप

Pune News : पुणे, धनश्री ओतारी

Pune News : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम याना एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने धमकी दिल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून पालिकेसह शहरात सुरु आहे. ९० कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मर्जीतील ठेकेदाराला मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या आमदाराने थेट महापालिका आयुक्तांवरच 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला. https://maharashtramirror.com/ Pune News

विशेष बाब म्हणजे आयुक्त नवलकिशोर राम यांनीदेखील या धमकीच्या घटनेला दुजोरा दिला. दरम्यान, याप्रकरणी काही तासांनंतर प्रतिक्रिया घेतली असता मला कोण धमकी देणार? असा उलट सवाल विचारत त्यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे धमकीच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?
आरटीओ चौक ते बंडगार्डन पूलादरम्यान मुळा-मुठा नदीच्या कडेने वेलस्ली रस्ता विकसित केला जाणार आहे. आरटीओ आणि जहांगीर चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा दोन किलोमीटर लांब आणि १७ मीटर रुंद पर्यायी मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रकल्पासाठी डिसेंबर २०२५ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये ८ ठेकेदारांनी सहभाग घेतला. मात्र, भाजपच्या संबंधित आमदाराला आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच हे काम लावायचे होते. कागदपत्र छाननीत एका पात्र ठेकेदाराला बेकायदेशीररित्या अपात्र ठरवण्यासाठी प्रशासनावर चौफेर दबाव आणण्यात आला. या राजकीय हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया तब्बल ६ ते ७ महिने ठप्प पडली होती.

अखेर हा प्रकार उजेडात आल्यानंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कठोर भूमिका घेत पथ विभागाला नियमानुसार कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश दिले.

प्रशासनाने कायदेशीर छाननी केल्यानंतर, ज्या ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी आमदार दबाव टाकत होते, त्याच ठेकेदाराची निविदा सर्वांत कमी दराची (१२ टक्के कमी) असल्याचे समोर आले. उलटपक्षी, आमदारांच्या मर्जीतील ठेकेदाराची निविदा अवघ्या १ टक्क्याने कमी होती. पात्र ठेकेदाराच्या दरामुळे महापालिकेचे ९ कोटी रुपये वाचले.

परंतु, मर्जीतील ठेकेदार हुकल्याने संतापलेल्या आमदाराने थेट आयुक्तांना फोन करून "तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन" अशी धमकी दिली. विशेष म्हणजे, पत्रकारांनी विचारणा केली असता आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आहे, मात्र संबंधित आमदाराचे नाव सांगण्याचे टाळले. थेट आयुक्तांना अशा प्रकारची धमकी आल्याने सर्वत्र एकच खळबळ सुरु झाली. अशातच आमदार सत्ताधारी असल्याने पालिकेच्या वर्तुळासह राजकीय गोटात उलट सुलट प्रश्न उपस्थित होऊ लागले.

दरम्यान, आयुक्तांनी बदलली भूमिका
या प्रकरणी आयुक्तांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी 'धमकी दिल्याची घटना पूर्णपणे खोटी आहे. या सर्व अफवा आहेत. मला कोण धमकी देणार?' असा उलट सवाल उपस्थित केला. विशेष बाब म्हणजे त्यावर त्यांनी अधिक बोलणेदेखील टाळले. 'काळजी करु नका. मला कोणीही धमकी दिलेली नाही' असे ते म्हणाले. आयुक्तांच्या या घुमजावमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे का? अशी चर्चादेखील शहरवासीयांमध्ये होत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा