मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे आणि बांधकाम साहित्याचा ढीग रचणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरोधात पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) आपला गांभीर्यपूर्वक बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा दंडात्मक कारवाईतून मिळाला १.८७ कोटी रुपयांचा महसूल
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा दंडात्मक कारवाईतून मिळाला १.८७ कोटी रुपयांचा महसूल

Pune News : दंडात्मक कारवाईतून मिळाला १.८७ कोटी रुपयांचा महसूल

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे आणि बांधकाम साहित्याचा ढीग रचणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरोधात पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) आपला गांभीर्यपूर्वक बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या जवळपास एका दशकापासून अपरिवर्तित राहिलेल्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत (जानेवारी ते ऑगस्ट २०२६) महापालिकेने दंडात्मक कारवाईतून तब्बल १.८७ कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

तरीही नागरिक बेशिस्तच

महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला तरीही शहरातील उघड्यावर कचरा टाकण्याचे आणि अस्वच्छतेचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांवर कडक शिस्तीचा आणि आर्थिक दणक्याचा धाक निर्माण व्हावा, या उद्देशाने महापालिकेने दंडाच्या रचनेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहा वर्षांनंतर दंडात्मक नियमांत सुधारणा

सध्या लागू असलेले दंडाचे दर हे 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६' अंतर्गत निश्चित करण्यात आले होते. सुमारे १० वर्षे उलटून गेल तरी त्यात कोणताही बदल झाला नव्हता. सध्या सामान्य कचरा टाकणे किंवा अस्वच्छता पसरवल्यास ५०० ते १,००० रुपये दंड आकारला जातो. उघड्यावर कचरा जाळल्यास ५,००० रुपयांपर्यंत तर बांधकामाचा राडारोडा/कचरा टाकल्यास २५,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा दंड अधिक कठोर बनवण्याचा प्रस्ताव मांडला असून, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीनंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

८ महिन्यांतील कारवाईचा लेखाजोखा (जानेवारी - ऑगस्ट २०२६ )

कारवाईचा प्रकार एकूण कारवाया वसूल झालेला दंड (रुपयांत)

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ११,४९९ ९०.३६ लाख

उघड्यावर लघुशंका करणे २,८२१ ५.७३ लाख

प्लास्टिकबंदीचे उल्लंघन (३,४१६.९ किलो जप्त) ५९१ ३१.५१ लाख

बांधकाम राडारोडा उघड्यावर टाकणे २५६ ४६.४४ लाख
ओला-सुका कचरा वेगळा न देणे १,००६ २.८४ लाख
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १८८ १.८७ लाख
उघड्यावर कचरा जाळणे ४९ ३.३० लाख
एकूण १६,५३२ १,८७,८२,३२५ रु.

मे महिन्यात सर्वाधिक दंड वसुली

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात सर्वाधिक ३६.७१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक म्हणजे २,९६३ दंडात्मक पावत्या (चलने) फाडण्यात आल्या.

"केवळ दंड वसूल करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे प्राधान्य आहे. दंडाची रक्कम पुरेशी नसल्यामुळे अनेक नागरिक दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष करतात. प्रस्तावित दंडवाढीमुळे नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होईल आणि स्वच्छ भारत अभियानात शहराचे मानांकन उंचावण्यास मदत होईल," असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा