PUNE NEWS : दिवे घाटात सुरक्षेची काळजी न घेता काम सुरू
धोकादायक वळणांवर प्रशासनाकडून सुरू असलेला निष्काळजीपणा
PG
Prashik Ghaste
1 मिनिट वाचन

धोकादायक वळणांवर प्रशासनाकडून सुरू असलेला निष्काळजीपणा
पुणे PUNE NEWS: पुणे-पंढरपूर मार्गावरील दिवे घाटात सध्या सुरक्षेची कोणतीही पुरेशी काळजी न घेता काम सुरू असल्याचे चित्र आहे. गुरुवारी (दि. ११ जून) सायंकाळी ५:५० च्या सुमारास घाटातील हा हलगर्जीपणा समोर आला.PUNE NEWS

घाटात काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक, रिफ्लेक्टर्स किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. अवघ्या काही दिवसांवर आषाढी पालखी सोहळा आलेला असताना, धोकादायक वळणांवर प्रशासनाकडून सुरू असलेला हा निष्काळजीपणा वाहनचालक आणि वारकऱ्यांच्या जिवाशी खेळणारा ठरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने येथे तत्काळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.PUNE NEWS
PUNE NEWS




