मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS :शहर आणि परिसरातून तीन नागरिक बेपत्ता

शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

PUNE NEWS :शहर आणि परिसरातून तीन नागरिक बेपत्ता

शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन

पुणे PUNE NEWS: पुणे शहर आणि परिसरातून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन नागरिक गूढरीत्या बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत हरवल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नोंद करून सर्वत्र शोध सुरू केला आहे.

या व्यक्तींबाबत कोणालाही काहीही माहिती मिळाल्यास तातडीने संबंधित पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.PUNE NEWS

हरवलेल्या व्यक्तींची नांवे आणि वर्णने खालीलप्रमाणे आहे:
मंगळवार पेठेतून गोरक्ष बारकु मदे बेपत्ता
गोरक्ष बारकु मदे (वय २९) (रा. ठाकरवाडी, आळेफाटा, ता. जुन्नर मूळ: ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हे २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ येथील परिसरातून 'राहत्या घरी जातो' असे सांगून निघाले, ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यांचा रंग गोरा, शरीर सडपातळ, उंची ५ फूट, डोक्याला समोरून टक्कल पडलेले असून बाजूने काळे केस आहेत. दाढी नाही, मिशांचे केस काळे असून चेहरा उभट आणि नाक सरळ आहे. ते मराठी व हिंदी भाषा बोलतात. त्यांनी पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आणि पायात चप्पल घातलेली आहे. त्यांच्या जवळ ९५२९५७९७१० हा मोबाईल क्रमांक आहे.PUNE NEWS

त्यांचा मित्र गणेश काशिनाथ नवले, यांनी तक्रार नोंदवली आहे. माहिती मिळाल्यास समर्थ पोलीस स्टेशन किंवा पोलीस हवालदार आय. आर. खान (बकल नं. ४४९५) यांच्याशी संपर्क साधावा.

पुष्कर सुहास आगरकर लिमेवाडीतून बेपत्ता
पुष्कर सुहास आगरकर (वय: ४३ वर्षे, व्यवसाय: नोकरी रा. लिमयेवाडी, पुणे) हे ३ जून २०२६ रोजी दुपारी १०:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून 'कामावर जातो' असे सांगून निघून गेले, ते अद्याप परत आले नाहीत. त्यांचा वर्ण गोरा, चेहरा गोल, केस काळे-पांढरे (मिडीयम), उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, बांधा मध्यम असून ते मराठी बोलतात. त्यांनी पिस्ता रंगाचा चेक्स असलेला पूर्ण बाहीचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि पायात काळ्या रंगाचे चामड्याचे शूज घातलेले होते. त्यांच्या डोक्यामध्ये ३२ टाक्यांचे व्रण (खूण) आहेत. सोबतीला २००० रुपये रोख रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल (क्रमांक ९७६३७०३४२८) आहे. त्यांची पत्नी स्मिता पुष्कर आगरकर यांनी तक्रार दिली आहे.PUNE NEWS

माहिती मिळाल्यास विश्रामबाग पोलीस ठाणे दूरध्वनी ०२०-२४४५७७५०, ९६५७३६५०३० किंवा पोलीस हवालदार आर. एस. मोरे (बकल नं. ६७९७) यांच्याशी संपर्क साधावा.

नकाश विठ्ठल पाटोळे बिबवेवाडीतून बेपत्ता
नकाश विठ्ठल पाटोळे (वय: ८७ वर्षे, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) येथून दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले आहेत. राहत्या घरातून 'फिरून येतो' असे सांगून निघून गेले, ते अद्याप घरी परत आलेले नाहीत. ते अंगाने मध्यम, रंगाने काळे-सावळे, चेहरा गोल, केस बारीक काळे-पांढरे. मिशी बारीक व पांढरी राखलेली आहे, डोळे काळे-पांढरे आणि उंची अंदाजे ५ फूट ४ इंच. ते मराठी बोलतात. त्यांनी भगव्या रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा पायजमा, डोक्यात पांढऱ्या रंगाची टोपी, गळ्यात तुळशीची माळ आणि भगव्या रंगाचे उपरणे परिधान केले होते तर पायात चॉकलेटी रंगाची कोल्हापुरी चप्पल घातली होती. ते सोबत ५,००० रुपये रोख रक्कम घेऊन गेले आहेत. त्यांच्या सून लक्ष्मी सुनील पाटोळे यांनी तक्रार दिली आहे.PUNE NEWS

माहिती मिळाल्यास बिबवेवाडी पोलीस स्टेशन किंवा महिला पोलीस हवालदार ए. ए. पारखे (बकल नं. ७२६२) यांच्याशी संपर्क साधावा.

सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की वरील वर्णनाचे इसम कोठेही दिसून आल्यास किंवा त्यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास त्वरित दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधून सहकार्य करावे.

PUNE NEWS

शेअर करा