मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News: मोहम्मदवाडीत प्रस्तावित टँकर भरणा केंद्राला नागरिकांचा तीव्र विरोध; वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

मोहम्मदवाडीत प्रस्तावित टँकर भरणा केंद्राला नागरिकांचा तीव्र विरोध; वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune News: मोहम्मदवाडीत प्रस्तावित टँकर भरणा केंद्राला नागरिकांचा तीव्र विरोध; वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

मोहम्मदवाडीत प्रस्तावित टँकर भरणा केंद्राला नागरिकांचा तीव्र विरोध; वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

Pune News: पुणे, महाराष्ट्र मिरर : मोहम्मदवाडी परिसरात पुणे महानगरपालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणी टँकर भरणा केंद्राविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आनंदवन, सैनिक विहार, ट्रायबेका मॉल, रहेजा सर्कल, डी-मार्ट, दोराबजी पॅराडाईज, गंगा किंग्स्टन, फ्लोरेन्टिना, कन्निदानाथ, एलिना, जेमिनी पार्क आदी परिसरातील रहिवाशांनी हे काम तातडीने थांबविण्याची मागणी करत महानगरपालिकेला निवेदन दिले आहे.( Pune News Strong opposition from residents to the proposed tanker filling station in Mohammadwadi

)

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, १७ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहम्मदवाडी परिसरासाठी नव्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करत हा परिसर ‘टँकरमुक्त’ करण्याची घोषणा केली होती. मात्र, दीड महिन्यानंतरही नागरिकांना अपुरा, कमी दाबाचा आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्याच भागात नवीन टँकर भरणा केंद्र उभारण्याचा निर्णय विरोधाभासी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

निवेदनानुसार, हे केंद्र रहेजा व्हिस्टा बी-२च्या प्रवेशद्वाराजवळ किंवा रहेजा रिझर्व्ह (इमारत क्रमांक १२ व १३) लगत सार्वजनिक सुविधांसाठी राखीव जागेवर उभारण्याचे नियोजन आहे. या ठिकाणाहून शहरातील विविध भागात पाणी टँकर पाठविले जाणार असल्याने परिसरातील वाहतूक कोंडी आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. आधीच नव्याने सुरू झालेल्या मॉल्स, वाढती वाहनसंख्या आणि अनियंत्रित पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, प्रस्तावित केंद्रापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर विबग्योर शाळा असून दररोज सुमारे ७५ ते ८० शालेय बस या मार्गावरून ये-जा करतात. सकाळी आणि दुपारच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पर्यायी जागेचा विचार करून हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.

शेअर करा