PUNE NEWS : स्वयंभू श्री वैकुंठेश्वर महादेवांच्या पावित्र्यावर घनकचरा विभागाचा घाला
शिवसेनेचा पुणे मनपाला ‘तांडव आंदोलनाचा’ इशारा!
1 मिनिट वाचन

शिवसेनेचा पुणे मनपाला ‘तांडव आंदोलनाचा’ इशारा!
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: वैकुंठ स्मशानभूमीच्या अधिकृत पार्किंगमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या शेकडो कचरा वाहतूक गाड्या अनधिकृतपणे उभ्या करून नागरिकांची गैरसोय केली जात असून, मांसाहारी व जैववैद्यकीय कचऱ्यामुळे स्वयंभू श्री वैकुंठेश्वर महादेव मंदिराचे पावित्र्य भंग होत असल्याचा गंभीर आरोप करत सोबत पुरावे जोडून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांना निवेदन सादर केले.PUNE NEWS

निवेदनात वैकुंठ स्मशानभूमीच्या अधिकृत पार्किंगमधून सर्व कचरा गाड्या तात्काळ हटविणे, संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर शिस्तभंग व दंडात्मक कारवाई करणे, मंदिर परिसराचे पावित्र्य कायम राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि भविष्यात मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा मांसाहारी अथवा जैववैद्यकीय कचरा येणार नाही याची लेखी हमी देण्याची मागणी करण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पुणे महानगरपालिकेसमोर तीव्र “तांडव आंदोलन” छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.PUNE NEWS
यावेळी बोलताना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत म्हणले वैकुंठेश्वर मंदिर गेले ६० दशकांहून अधिक काळ तिथे असून त्याची नित्य नियमाने पूजा अर्चना होते, पण पुणे मनपाच्या भोंगळ कारभारा मुळे पवित्र स्थळ अपवित्र करण्याचा प्रयत्न होत असून सर्व गाड्या त्वरित न हलविल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करावे लागेल .PUNE NEWS
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त वारुळे यांनी दोन दिवसात स्थळ पाहणी करून यावर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.PUNE NEWS
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहर संघटक किशोर राजपूत, विभाग प्रमुख चंदन साळुंके, नितीन परदेशी, युवासेना शहराध्यक्ष युवराज पारिख, परेश खांडके, अमर मारटकर, दिलीप पोमन, सूरज खंडाळे, प्रतीक आल्हाट, सुनील गायकवाड तसेच वैकुंठेश्वर मंडळाचे पदाधिकारी शुभम शिंदे, भारत कोरटकर, राम लांडगे, पुंडलिक शिंदे, योगेश कदम, मंगेश होडे, माऊली तानपुरे, प्रमोद शिंदे, सागर शिंदे, पंचम अभंग, सुधीर शिंदे, उपस्थित होते.
PUNE NEWS




