मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS: महापालिकेच्या आरोग्य विभागात फेरवाटप

सहायक आरोग्य अधिकारी यांना नव्याने दिल्या जबाबदाऱ्या

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS: महापालिकेच्या आरोग्य विभागात फेरवाटप

सहायक आरोग्य अधिकारी यांना नव्याने दिल्या जबाबदाऱ्या

निलेश राऊत
पुणे:
महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकारी पदांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांकडील पदांची पुनर्रचना करण्यात आली आहे. PUNE NEWS

१ जून पासून नवीन जबाबदाऱ्या
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार १ जून २०२६ पासून नवीन जबाबदाऱ्या लागू करण्यात आल्या आहेत. नव्या आदेशानुसार डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे साथरोग नियंत्रण, जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) अंतर्गत कामे, महापौर योजना, राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार कार्यक्रम यांसह पीसीपीएनडीटी व एमटीपी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. डॉ. मनीषा नाईक यांच्याकडे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी यासोबतच औषध भांडाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर डॉ. सूर्यकांत देवकर यांच्याकडे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट, नर्सिंग होम नोंदणी, विकेंद्रित परवाना विभाग आणि एड्स नियंत्रण विभागासह पीपीपी प्रोजेक्ट, अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना, स्व. अजितदादा पवार शहरी सुधारणा व आधुनिकीकरणाची अतिरिक्त गरीब योजना, तसेच महापालिकेच्या रुग्णालयांच्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे. PUNE NEWS

डॉ. राजेश दिघे यांच्याकडे कीटक प्रतिबंधक विभाग, सामाजिक दायित्व योजना (सीएसआर), स्मशानभूमी व दफनभूमीचे संपूर्ण कामकाज, बोगस डॉक्टर शोधमोहीम आणि राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम यांच्यासह मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सर्व सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली कामकाज करावे, तसेच संबंधित विभागांचा कार्यभार स्वीकारून त्याबाबतचा अहवाल खातेप्रमुखांकडे सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

PUNE NEWS

शेअर करा