PUNE NEWS: महापालिकेच्या आरोग्य विभागात फेरवाटप
सहायक आरोग्य अधिकारी यांना नव्याने दिल्या जबाबदाऱ्या
1 મિનિટ વાંચન

सहायक आरोग्य अधिकारी यांना नव्याने दिल्या जबाबदाऱ्या
निलेश राऊत
पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकारी पदांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांकडील पदांची पुनर्रचना करण्यात आली आहे. PUNE NEWS

१ जून पासून नवीन जबाबदाऱ्या
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार १ जून २०२६ पासून नवीन जबाबदाऱ्या लागू करण्यात आल्या आहेत. नव्या आदेशानुसार डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे साथरोग नियंत्रण, जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) अंतर्गत कामे, महापौर योजना, राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार कार्यक्रम यांसह पीसीपीएनडीटी व एमटीपी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. डॉ. मनीषा नाईक यांच्याकडे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी यासोबतच औषध भांडाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर डॉ. सूर्यकांत देवकर यांच्याकडे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट, नर्सिंग होम नोंदणी, विकेंद्रित परवाना विभाग आणि एड्स नियंत्रण विभागासह पीपीपी प्रोजेक्ट, अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना, स्व. अजितदादा पवार शहरी सुधारणा व आधुनिकीकरणाची अतिरिक्त गरीब योजना, तसेच महापालिकेच्या रुग्णालयांच्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे. PUNE NEWS
डॉ. राजेश दिघे यांच्याकडे कीटक प्रतिबंधक विभाग, सामाजिक दायित्व योजना (सीएसआर), स्मशानभूमी व दफनभूमीचे संपूर्ण कामकाज, बोगस डॉक्टर शोधमोहीम आणि राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम यांच्यासह मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सर्व सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली कामकाज करावे, तसेच संबंधित विभागांचा कार्यभार स्वीकारून त्याबाबतचा अहवाल खातेप्रमुखांकडे सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
PUNE NEWS
