मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : राजा माने यांना "शांतीदूत"राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

पुणे, दि.- संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना "शांतीदूत"हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले."शांतीदूत" चे संस्थापक व निवृत्त आय पी एस अधिकारी डॉ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune News : राजा माने यांना "शांतीदूत"राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

पुणे, दि.- संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना "शांतीदूत"हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले."शांतीदूत" चे संस्थापक व निवृत्त आय पी एस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजा माने हे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य आहेत.गेली ४२ वर्षे ते महाराष्ट्राच्या पत्रकारितेत सक्रीय आहेत.

या प्रसंगी सौ विद्याताई जाधव यांच्या हस्ते सौ मंदा माने यांचा ही सन्मान करण्यात आला.

या वेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्य सचिव महेश कुगावकर, राज्य संघटक अमोल पाटील,पुणे शहर पदाधिकारी पराग डिंगनकर , शांतीदूत परिवाराचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुरेश सपकाळ ,सचिव ,मधूकर चौधरी ,अध्यक्ष शिवाजी नगर शांतीदूत परिवार आदी उपस्थित होते.

शेअर करा