मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : आषाढी वारीसाठी पुणे महापालिका सुसज्ज

पालखी सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

PUNE NEWS : आषाढी वारीसाठी पुणे महापालिका सुसज्ज

पालखी सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून पालखी मार्गाची पाहणी

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. वारकऱ्यांना वारी सुलभ आणि सुखकर व्हावी यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या कामांचे तात्काळ नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.PUNE NEWS

आषाढी वारीसाठी पुणे शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे स्वागत अत्यंत भक्तिभावाने, सुरक्षित आणि सुसज्ज रीतीने करण्यासाठी महापालिकेने सर्वंकष नियोजन आखले आहे. या नियोजनाचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. १६) पुणे शहरातील विविध पालखी मार्गांची लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.PUNE NEWS

आगामी पावसाळा लक्षात घेता पावसाळी गटारे, चेंबर्स आणि मुख्य नाल्यांची संपूर्ण साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालखी मार्गावर अद्ययावत सुविधा आणि चोवीस तास साफसफाई
करण्यात येणार आहे.

पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि डागडुजी केली जाणार आहे. वारी दरम्यान स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि चोवीस तास साफसफाईची विशेष यंत्रणा तैनात केली जाणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुरेसा पाणीपुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, फिरती स्वच्छतागृहे तथा मोबाईल टॉयलेट्स आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती या कामांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. पालखी मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक बळकट केली जाईल. वारी दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चोवीस तास वाहतूक व्यवस्थापन केले जाईल आणि मार्गावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे त्वरित हटवली जातील. वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी विसावा केंद्रे, आराम कक्ष उभारण्यात येणार असून पालखीच्या मुक्कामस्थळी विशेष स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे.

याशिवाय आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, डास आणि कीटक प्रतिबंधक औषध फवारणी यांसारख्या आवश्यक आरोग्य सुविधाही पुरवल्या जातील. वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज आणि अत्यंत सुखकर अनुभव मिळावा यासाठी पुणे महापालिका पूर्ण ताकदीने कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.PUNE NEWS

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोपान चव्हाण उपस्थित होते. तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर, सुनील शिंदे, सुहास टिंगरे, हर्षल रवी टिंगरे, शीतल सावंत, संगीता दांगट, अश्विनी भंडारे, नंदिनी धेंडे, रफिक शेख, पल्लवी जावळे, रवींद्र काकडे आणि दत्ता बहिरट यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

PUNE NEWS

शेअर करा