PUNE NEWS : जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त विश्रांतवाडीत जनजागृती दुचाकी रॅली;
मुक्तांगणच्या पथनाट्याने वेधले लक्ष
1 मिनिट वाचन

मुक्तांगणच्या पथनाट्याने वेधले लक्ष
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त निर्भय विद्यार्थी अभियान व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (२६ जून) व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलूमुला यांनी केले.PUNE NEWS

सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० या वेळेत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथून रॅलीला सुरुवात झाली. मुकुंदराव आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक (कळस), श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, आर अँड डी ई, विश्रांतवाडी चौक, धानोरी रोड, गोकुळनगर, भैरवनगर, भरत ढाबा, धानोरी जकात नाका, जाणता राजा चौक, गणपती चौक (मुंजाबा वस्ती), टिंगरेनगर, एअरपोर्ट रोड, सावंत पेट्रोल पंप चौक, कॉमरझोन, अग्रसेन शाळा, आरटीओ, सापरस चौक, आदर्श इंदिरानगर असा विविध भागातून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे झाला.PUNE NEWS
रॅलीमध्ये एकूण ५२ दुचाकी सहभागी झाल्या. महिला व पुरुष पोलीस अंमलदार, पोलीस मित्र, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य तसेच नागरिक असे १०० ते १२० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रच्या कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्तीवरील प्रबोधनपर गीते सादर केली, तसेच प्रभावी पथनाट्य सादर करून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.PUNE NEWS
युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी, सुरक्षित आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, हा संदेश या जनजागृती रॅलीद्वारे देण्यात आला. संपूर्ण रॅली शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
PUNE NEWS




