मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : पुण्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS : पुण्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: मागील दोन आठवड्यांपासून असह्य उकाडा आणि कडक उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना रविवारी (दि. २१) दुपारनंतर झालेल्या दमदार मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला. दरम्यान, पुढील चोवीस तासांत मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण होत असून, लवकरच मान्सून पुण्यात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तर या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.PUNE NEWS

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना रविवारी दिलासा देणाऱ्या पावसाने विशेषतः धरणक्षेत्रासह हवेली परिसरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एनडीए परिसरात सर्वाधिक ७९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या परिसरातील रस्ते जलमय झाले होते. दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याने पहिल्याच पूर्वमोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. शिवाजीनगर परिसरात १९, हडपसर येथे ९, तर पाषाण परिसरात ४ मिमी पावसाची नोंद झाली.PUNE NEWS

यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे शहरातील कमाल तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली होती. गेल्या आठ दिवसांत हे तापमान ३७ अंशांच्या आसपास रेंगाळत होते. सततच्या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत होती, अशा परिस्थितीत आज दुपारनंतर हजेरी लावलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला.PUNE NEWS

रविवारी सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. दुपारनंतर मात्र हवामानात अचानक बदल झाला. दुपारी बाराच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये काळे ढग जमा झाले आणि पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने दमदार पुनरागमन केले. दुपारनंतर सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले होते. रविवारच्या सुट्टीमुळे मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

PUNE NEWS

शेअर करा