PUNE NEWS : शहरातील दोन लाख ७४ हजार बालकांना दिला पोलिओचा डोस
वंचित बालकांसाठी पुढील पाच दिवस लसीकरण
1 मिनिट वाचन

वंचित बालकांसाठी पुढील पाच दिवस लसीकरण
पुणे, निलेश राऊत, PUNE NEWS: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात रविवारी (दि. २८) ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण २ लाख ७४ हजार ५४९ बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. ही आकडेवारी ८८.९५ टक्के असून, उर्वरित बालकांसाठी पुढील पाच दिवस घराघरांत जाऊन लसीकरण केले जाणार आहे.PUNE NEWS

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत १,१८२ पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे, ९५ आरोग्यवर्धिनी केंद्रे तसेच वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे आणि अतिजोखमीच्या भागांमध्ये विशेष पोलिओ केंद्रे उभारण्यात आली होती.PUNE NEWS मुख्य लसीकरण केंद्र नारायण पेठ येथे जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले.शहरातील विविध आरोग्य केंद्रात रविवारी बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.PUNE NEWS
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कै. शांताबाई खडसरे दवाखान्याला भेट देऊन मोहिमेची पाहणी केली. तसेच नगर रोड व येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतील केंद्रांना अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे यांनी मार्गदर्शन केले. हडपसर व धनकवडी भागातील केंद्रांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले.
पथकांमार्फत २२ हजार ४२३ बालकांना दिले पोलिओ डोस
प्रवासात असलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी बस स्थानके, एसटी स्थानके, मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि उद्याने येथे ८४ ट्रान्झिट टीम आणि ४२ मोबाईल टीम तैनात करण्यात आल्या होत्या. या पथकांमार्फत २२ हजार ४२३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.PUNE NEWS
वंचित बालकांसाठी पुढील पाच दिवस १,६५५ पथके तैनात
राज्य शासनाकडून ४ लाख २० हजार ७२० डोस प्राप्त झाले होते. २ लाख ८७ हजार १८७ डोस वापरण्यात आले. वंचित बालकांसाठी पुढील पाच दिवस १,६५५ पथके आणि ३२९ पर्यवेक्षक शहरभर कार्यरत राहणार आहेत. सर्व दवाखान्यांत पोलिओ डोस उपलब्ध असतील, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली आहे.
PUNE NEWS




