मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : ७ कोटी ९७ लाख रुपये खर्च करूनही मुळा-मुठा नदीत जलपर्णीची समस्या जैसे थे

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

Pune News

Pune News : मुळा-मुठा नदी आणि विविध तलावांमधील जलपर्णी हटवण्यासाठी गेल्या चार वर्षांत तब्बल ७ कोटी ९७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune News : शहरातील मुळा-मुठा नदी आणि विविध तलावांमधील जलपर्णी हटवण्यासाठी गेल्या चार वर्षांत तब्बल ७ कोटी ९७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, एवढा अवाढव्य निधी खर्च होऊनही नदीपात्रातील जलपर्णीची समस्या जैसे थेच आहे. असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. pune news mula mutha river jalparni

FDA : पुण्यातील पेठांमध्ये धडक कारवाई; ५५ लाखांचा निकृष्ट अन्नसाठा जप्त, ५ हॉटेल्सचे परवाने निलंबित

पुणे महानगरपालिकेने माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरावरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेने २०२२-२३ पासून मुळा-मुठा नदीसह पाषाण, कात्रज, जांभूळवाडी आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावांमधील जलपर्णी काढण्यासाठी १२ कोटी ८८ लाख रुपयांची कामे मंजूर केली आहेत. यापैकी तब्बल ७ कोटी ९७ लाख रुपयांची बिले ठेकेदारांना अदाही करण्यात आली आहेत. परंतु, एवढा मोठा खर्च होऊनही प्रत्यक्षात नदीपात्राची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे दिसून येत आहे. Pune News

ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाचे संगनमत?

निविदेच्या नियमांनुसार स्पायडर मशीनचा वापर करून जलपर्णी मुळापासून बाहेर काढणे, त्याची सुरक्षित वाहतूक करणे आणि योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप पुणे पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी केला आहे. अनेक ठिकाणी जलपर्णी नदीच्या काठावरच तशीच टाकली जाते.

Pune University : बनावट पदवी प्रमाणपत्र रॅकेट उघड; रिक्षाचालकाच्या सतर्कतेने फुटले बिंग

पावसाळ्यात ती पुन्हा नदीत वाहून जाते आणि याच कामाची पुन्हा नव्याने बिले उचलली जातात. महापालिकेला दाखवण्यासाठी केवळ काही वेळ जेसीबी पाण्यात उतरवून वरवरची जलपर्णी बाजूला केली जाते आणि प्रसिद्धीसाठी 'काम सुरू असल्याचे' फोटो व्हायरल केले जातात. असा आरोपही स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पुराच्या काळात नदीत आलेल्या पाण्यामुळे जलपर्णी एका बाजूला सरकली होती, मात्र पाणी ओसरल्यानंतर तीच जलपर्णी नदीकाठी मोठ्या प्रमाणात साचून सडली आहे. सध्या होळकर ब्रिज घाट परिसरात जलपर्णी कुजल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

या कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली असतानाही महापालिका प्रशासन गांभीर्याने पावले उचलत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Illegal Construction: पुणे महापालिकेचा बडगा; लोहगाव-खराडीत २१ हजार चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

पुणेकरांच्या करातून गोळा झालेला निधी अशा प्रकारे कागदी घोडे नाचवून लुटला जात असेल, तर पुणे पॅंथर सेना गप्प बसणार नाही. या भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

  • सचिन भोसले , संस्थापक अध्यक्ष, पुणे पॅंथर सेना
  • View this post on Instagram

    A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

    शेअर करा