FDA : पुण्यातील पेठांमध्ये धडक कारवाई; ५५ लाखांचा निकृष्ट अन्नसाठा जप्त, ५ हॉटेल्सचे परवाने निलंबित
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

FDA : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी मोहीम
पुणे, महाराष्ट्र मिरर
FDA नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि नियमबाह्य अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील घाऊक व्यापारी व प्रसिद्ध मिठाई दुकानांवर धडक छापे टाकण्यात आले असून, ५ प्रमुख हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे पुणे, सातारा आणि सांगली परिसरातील अन्नपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. fda raid pune peth areas food seized

एफडीएच्या वतीने २४ ते २७ जुलै दरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष तपासणी मोहिमेत पुणे शहरातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या मध्यवर्ती भागांतील व्यावसायिक आस्थापनांवर केलेल्या कारवाईत सुमारे ५५ लाखांहून अधिक किमतीचा संशयित निकृष्ट, असुरक्षित, चुकीच्या लेबलिंगचा आणि विनापरवाना साठवून ठेवलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
गणेश पेठ मध्ये मे. वर्धमान एंटरप्रायझेस येथे छापा टाकून अन्ना मलई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा सुमारे २,९२२ किलो वजनाचा आणि ७.८३ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच मे. न्यू पांडियन एंटरप्रायझेस मधून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा ५८ हजाराঁहून अधिक, तर इतर प्रतिष्ठानांतून संशयित निकृष्ट माल जप्त करण्यात आला. FDA
भवानी पेठ येथील माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामावर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. या ठिकाणी आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसताना साठवून ठेवलेला तब्बल १४,३२६ किलोहून अधिक सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोल असा ३६.३९ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. तर नाना पेठमध्ये मे. विजय लक्ष्मी ट्रेडर्स येथे राईस सेव आणि फरसाण उत्पादनांवर, यासोबतच मे. गोयल सेल्स कॉर्पोरेशन येथून काजू, बदाम, मनुका, मटण मसाला आणि मोहरी असा ७० हजारांपेक्षा जास्त किमतीचा संशयित निकृष्ट व चुकीच्या ब्रँडिंगचा साठा जप्त करण्यात आला. FDA

Pune University : बनावट पदवी प्रमाणपत्र रॅकेट उघड; रिक्षाचालकाच्या सतर्कतेने फुटले बिंग
एफडीएने जप्त केलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये (FSSAI) संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सणासुदीच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत ही मोहीम अशीच तीव्र ठेवण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी लेबल व मुदत तपासून घ्यावी, असे आवाहनही एफडीआतर्फे करण्यात आले आहे.





