मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्यात अल्पसंख्यांक समाजाच्या नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश

Pune Latest News : मुस्लिम नेते अशफाक मोमीन यांना शहरप्रमुख पदाची जबाबदारी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune News : पुण्यात अल्पसंख्यांक समाजाच्या नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश

Pune Latest News : मुस्लिम नेते अशफाक मोमीन यांना शहरप्रमुख पदाची जबाबदारी

पुणे :- पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते अशफाक मोमीन Ashraf Momin यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शिवसेना भवन येथे पार पडला.

या वेळी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या पुढाकाराने अशफाक मोमीन यांच्यावर शिवसेना अल्पसंख्यांक शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नियुक्तीपत्र अजय भोसले यांच्या हस्ते मोमीन यांना देण्यात आले.

अशफाक मोमीन यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक लढवली होती. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील शिवसेनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, जिल्हा बांधकाम कामगार सेना प्रमुख संतोष रजपूत, उपजिल्हा प्रमुख मनोज खुडे, हवेली तालुका प्रमुख रोहन शिंदे, सचिव गुरुनाथ सुतार यांच्यासह शिवसैनिक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहसंपर्कप्रमुख अजय भोसले म्हणाले, "एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या न्यायासाठी झटत आहेत. पुण्यात शिवसेनेचा जोर वाढत असून आगामी महापालिका व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना दमदार मुसंडी मारेल."

शिवसेनेत अल्पसंख्यांक समाजाचा सहभाग वाढल्याने संघटनेला नवसंजीवनी मिळाली असून, सर्वांनी पक्ष वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संतोष रजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय कक्ष प्रमुख अजय सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा