PUNE NEWS : केतन अग्रवाल हत्या प्रकरणसिया-चेतनमध्ये आरोप-प्रत्यारोप; तपासाला नवे वळण
परस्परविरोधी जबाबांमुळे दोघांच्या पार्श्वभूमीसह डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू
3 मिनिट वाचन

परस्परविरोधी जबाबांमुळे दोघांच्या पार्श्वभूमीसह डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू
पुणे PUNE NEWS: रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या कथित हत्या प्रकरणाच्या तपासात नवे वळण आले असून, अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चौकशीदरम्यान एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. या परस्परविरोधी जबाबांमुळे पोलिसांनी दोघांच्या पार्श्वभूमीसह डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू केली आहे.PUNE NEWS

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सिया गोयलने चौकशीत केतनला मारण्याचा कट चेतन चौधरीने रचल्याचा दावा केला आहे. मात्र, चेतनने हा आरोप फेटाळून लावत उलट सियानेच केतनला संपवण्याचा आग्रह धरल्याचा आरोप केला आहे. तसेच, केतन पळून जाऊन सियाशी लग्न करण्यास तयार होता, असेही चेतनने पोलिसांना सांगितल्याचे समजते. या दोन्ही दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.PUNE NEWS
सिया गोयल कोण?
२० वर्षीय सिया गोयल ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. ती बिबवेवाडी परिसरातील व्यावसायिक कुटुंबातील असून तिच्या कुटुंबाचा सुकामेव्याचा व्यवसाय आहे. तिने नुकताच बेकरी व्यवसाय सुरू केला होता. केतनच्या कुटुंबीयांच्या मते, सिया मनमिळावू आणि मृदुभाषी स्वभावाची होती. ती अनेक धार्मिक कार्यक्रम आणि कौटुंबिक समारंभांमध्ये सहभागी होत असे.
उदयपूरमध्ये होणार होते लग्न
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पुण्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये साखरपुडा झाला होता. दोन्ही कुटुंबे दूरचे नातेवाईक असून वर्षाअखेरीस राजस्थानातील उदयपूर येथे शाही पद्धतीने लग्न होणार होते. पाहुण्यांसाठी दोन चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. केतनच्या मृत्यूनंतर या जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.PUNE NEWS
चेतन चौधरीची भूमिका
चेतन चौधरी हा मार्केट यार्ड परिसरातील मसाले आणि सुकामेव्याच्या व्यवसायाशी संबंधित कुटुंबातील आहे. त्याचे वडील बाबूलाल चौधरी यांनी आपल्या मुलाला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. चेतनचे वकील राम शहाणे यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, फिर्यादी पक्षाकडे चेतनला कथित गुन्ह्याशी थेट जोडणारा ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही. सिया आणि चेतन यांच्यात संपर्क होता, मात्र तो केवळ मैत्री आणि व्यवसायापुरता मर्यादित होता, असा बचाव पक्षाचा दावा आहे.
तपास सुरूच
केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू असून, आरोपींच्या परस्परविरोधी जबाबांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांकडून सर्व पुरावे आणि साक्षींची पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील घटनाक्रम आणि जबाबदारीबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे.PUNE NEWS
सियाच्या जबाबाशी विसंगत चॅट्स सापडल्याचा पोलिसांचा दावा
या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा दावा समोर आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी सिया गोयलच्या मोबाईल फोनमधून मिळालेले चॅट्स आणि डिजिटल पुरावे तिने चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबांशी विसंगत असल्याचे आढळले आहे. तसेच, आरोपींनी घटनेपूर्वी लोहगड किल्ल्याची पाहणी करून त्यानंतर मोबाईलमधील कॉल आणि संदेश हटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सिया गोयलने केतन अग्रवालशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. तिने केतनला हा निर्णय वारंवार कळविल्याचा दावा करत, प्रत्येक वेळी केतन "आता खूप उशीर झाला आहे, परिस्थिती बदलू शकत नाही," असे उत्तर देत असल्याचेही सांगितले.PUNE NEWS
मात्र, तपासादरम्यान दोघांच्या मोबाईल फोनमधून मिळालेल्या चॅट्समधून वेगळेच चित्र समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संभाषणांमध्ये सिया आणि केतन यांच्यात स्नेहपूर्ण संवाद दिसून येतो. नियोजित ट्रिपपूर्वीही दोघे सामान्य जोडप्याप्रमाणे संवाद साधत असल्याचे चॅट्समधून स्पष्ट होत असून, त्यामुळे सियाच्या जबाबाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
याशिवाय, या हत्येचे पूर्वनियोजन करण्यात आल्याचाही तपास यंत्रणांचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रेकिंगची आवड असलेल्या केतनला मे महिन्याच्या अखेरीस सियाने सहलीच्या निमित्ताने लोहगड किल्ल्यावर नेले होते. त्या भेटीदरम्यान तिने परिसराची पाहणी केली, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ठिकाणे लक्षात ठेवली आणि आसपासच्या परिसराचा अभ्यास केल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे. तसेच, घटनेपूर्वी लोहगड किल्ल्याचे व्हिडिओ ऑनलाइन शोधल्याचे डिजिटल पुराव्यांतून समोर आल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.PUNE NEWS
दरम्यान, या सर्व बाबी या टप्प्यावर पोलिसांच्या तपासातील दावे असून त्यांची न्यायालयीन पडताळणी होणे अद्याप बाकी आहे. आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी मानले जाऊ शकत नाही.
केतन विग वापरतो हे हत्येचे कारण?
चौकशीदरम्यान सिया गोयल हिने दिलेल्या कारणांपैकी केतन अग्रवाल टक्कल लपवण्यासाठी हेअर पॅच (केसांचा पेंच) वापरत असल्याचा मुद्दाही चर्चेत आला. मात्र, तपास यंत्रणांनी अद्याप हा मुद्दा कथित हत्येचे थेट कारण असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.PUNE NEWS
दरम्यान, केतन यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केतन हेअर पॅच वापरत असल्याची माहिती दोन्ही कुटुंबांना आधीपासूनच होती. त्यामुळे या गोष्टीचा त्यांच्या मुलाच्या मृत्यूशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
PUNE NEWS




