मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : पुणे केतन अग्रवाल हत्या प्रकरण: वकिलाने आरोपीच्या भावाला पाठवली १० कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस

साहिलने माध्यमांसमोर वकिलांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "धमकी" दिल्याचा खोटा आरोप केल्याचा दावा

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS : पुणे केतन अग्रवाल हत्या प्रकरण: वकिलाने आरोपीच्या भावाला पाठवली १० कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस

साहिलने माध्यमांसमोर वकिलांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "धमकी" दिल्याचा खोटा आरोप केल्याचा दावा

पुणे PUNE NEWS: शहरातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला १० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. साहिल गोयलने माध्यमांसमोर वकिलांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "धमकी" दिल्याचा खोटा आरोप केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.PUNE NEWS

२६ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अलीकडेच एका कॅब ड्रायव्हरच्या दाव्यानंतर या प्रकरणाची चर्चा माध्यमांमध्ये वाढली असतानाच, साहिल गोयलने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत श्रीवास्तव यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता.PUNE NEWS

या आरोपांचे खंडन करत ॲड. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की, सिया गोयल ही सज्ञान असून तिने स्वतःच्या इच्छेने वकिलीपत्र (वकालतनामा) स्वाक्षरित केले आहे, जे पुणे येथील वडगाव मावळ न्यायालयात सादर करण्यात आले आहे. साहिलच्या विधानांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा त्यांनी केला आहे. या नोटीसद्वारे साहिलला ४८ तासांच्या आत बिनशर्त माफी मागण्यास, आणि ७ दिवसांत १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यास सांगण्यात आले आहे. असे न केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

PUNE NEWS

शेअर करा