मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : इंदिरानगर (पवारवाडी) जि. प. शाळा धोक्याच्या छायेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

गणेश मंदिरात भरवावी लागत आहे शाळा; नवीन शाळेसाठी जागा देण्याची ग्रामस्थांची मागणी

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

Pune News : इंदिरानगर (पवारवाडी) जि. प. शाळा धोक्याच्या छायेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

गणेश मंदिरात भरवावी लागत आहे शाळा; नवीन शाळेसाठी जागा देण्याची ग्रामस्थांची मागणी

पुणे, महाराष्ट्र मिरर, Pune News : राज्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, इमारतींचे नुकसान आणि विविध दुर्घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जीर्ण शाळा व अंगणवाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर (पवारवाडी) येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीची स्थिती पाहता 'एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?' असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.Pune News

इंदिरानगर (पवारवाडी) येथील जि. प. शाळेची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. यंदाच्या मुसळधार पावसात व वादळी वाऱ्यामुळे शाळेचे सिमेंटचे पत्रे उडाले, काही पत्रे फुटले आणि भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. पावसाचे पाणी थेट भिंतींमध्ये झिरपल्याने संपूर्ण इमारत ओलसर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा तात्पुरत्या स्वरूपात शेजारील गणेश मंदिरात भरविण्यात येत आहे. शाळेने याबाबत पंचायत समिती भोरचे गटविकास अधिकारी तसेच नसरापूर ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन वस्तुस्थिती विशद केली आहे आणि शाळेची दुरुस्ती पूर्ण होऊन भिंती सुरक्षित झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत हलविण्यात येईल, असे या नमूद केले आहे.Pune News

शाळेच्या मागील बाजूस डोंगराचा उतार आहे. सततच्या पावसामुळे या भागातील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आहे. त्यामुळे भविष्यात शाळेवर डोंगराची दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जर योग्य वेळी संरक्षण भिंत, पाणी निचऱ्याची व्यवस्था किंवा इतर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.Pune News

शाळेसमोरील मोठे पिंपळाचे झाडही विद्यार्थी आणि अंगणवाडीसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

याच परिसरातील अंगणवाडीची इमारत नवीन असली तरी तिच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे लहान बालकांना अंगणवाडीत बसताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. तसेच या अंगणवाडीचा परिसर डोंगरालगत असल्याने रानडुक्कर व इतर वन्यप्राणी येथे वारंवार येतात. त्यामुळे इमारतीच्या पायाभूत सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Pune News

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामस्थांच्या मते, केवळ तात्पुरती दुरुस्ती करून हा प्रश्न सुटणारा नाही. नवीन शाळेची उभारणी हा एकमेव कायमस्वरूपी पर्याय आहे. चेलाडी येथे ज्या पद्धतीने नवीन अंगणवाडी उभारण्यात आली, त्याच परिसरात जिल्हा परिषद शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी उत्कृष्ट आणि आधुनिक जिल्हा परिषद शाळा उभारता येईल. या शाळेचा लाभ इंदिरानगर (पवारवाडी), कातकरी समाजातील विद्यार्थी तसेच परिसरातील इतर छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांनाही होईल.Pune News

ग्रामस्थांनी नसरापूर ग्रामपंचायत, पंचायत समिती भोर, जिल्हा परिषद पुणे तसेच भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नवीन शाळेसाठी जागा निश्चित करावी, निधी मंजूर करून आधुनिक जि. प. शाळेचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

Pune News

शेअर करा