मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीकरण

बारामती येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS : पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीकरण

बारामती येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: 'पोलिओमुक्त भारत' ही आपली सामूहिक जबाबदारी आहे; यादृष्टीने राज्यभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे; पोलिओवर मात करण्याचा प्रभावी मार्ग लसीकरण आहे, त्यामुळे प्रत्येक पालकाने जबाबदारीने पुढे येऊन आपल्या पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.PUNE NEWS

श्रीमती पवार यांच्या हस्ते महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे बालकांना लसीचे दोन थेंब पाजून जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.PUNE NEWS

या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.PUNE NEWS

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार पुढे म्हणाल्या, पोलिओमुक्त महाराष्ट्र राज्यासह भारत देशाकरिता आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, या लसीमुळे बालकाचे आयुष्य सुरक्षित आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे. निरोगी बालक, निरोगी कुटुंब आणि निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी हातभार लावूया, चला एकत्र येऊया आणि पोलिओमुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधिक बळकट करूया.

PUNE NEWS

शेअर करा