मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : गंगाधाम रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावर कारवाईचा प्रयत्न

स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध; तीव्र आंदोलनाचा इशारा

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS : गंगाधाम रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावर कारवाईचा प्रयत्न

स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध; तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे PUNE NEWS: बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सीतल वाकडे यांनी गंगाधाम रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावर कारवाई करण्यासाठी आकाशचिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविले. मात्र, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते लखन वाघमारे, सुधीर बनसोडे तसेच स्थानिक नागरिकांनी या कारवाईस तीव्र विरोध दर्शविला.PUNE NEWS

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, गंगाधाम रोड परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत स्टॉल, फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावरच कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.PUNE NEWS

निवडक कारवाई का?
“गंगाधाम रोडवरील इतर अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई का केली जात नाही? निवडक कारवाईमागील कारण काय?” असा सवाल लखन वाघमारे, सुधीर बनसोडे आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.PUNE NEWS

सर्व प्रकारच्या अनधिकृत अतिक्रमणांवर समान निकषांवर कारवाई करण्यात यावी व कोणत्याही प्रकारचा दुजाभाव होऊ नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

जर डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावर कारवाई केली तर सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लखन वाघमारे व सुधीर बनसोडे यांनी दिला आहे.

PUNE NEWS

शेअर करा